0 0
Read Time:2 Minute, 29 Second



 फक्त माध्यमिक शिक्षक/ शिक्षिकांसाठी

‘मासिक पाळी संवादक’

Online कार्यशाळेचे आयोजन

भारतात दरवर्षी सहावी ते दहावी या वयोगटातील ४०% मुली शाळाबाह्य होतात. त्यामागच्या मुख्य कारणांमधलं एक कारण म्हणजे त्यांना मासिक पाळी सुरू झालेली असते. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर केला जाणारा विवाह, शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नसणे, शौचालय सुरू नसणे, त्यात पाणी नसणे, अस्वच्छ असणे त्यासोबत पॅड घेणे परवडत नसल्याने मासिक पाळीत शाळेत डाग पडण्याची भीती, पॅड बदलण्याची अडचण, होणारा शारीरिक त्रास, पाळीत मिळणाऱ्या वागणुकीमुळे मनात न्यूनगंड तयार होणे, भीती व मानसिक ताण या सगळ्या अडचणींमध्ये मुली पाळीत शाळेत जाणं टाळतात आणि हळूहळू शाळाबाह्य होतात.

नैसर्गिक असलेली पाळी जर मुलींच्या शिक्षणाच्या आड येत असेल तर त्यावर मोकळेपणाने बोलणं, पाळीस पूरक वातावरण शाळेत निर्माण करणं हे शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे. ज्या संवेदनशील, प्रयोगशील शिक्षकांना यावर बोलणं गरजेचं वाटतंय पण हे करायचं कसं ? यावर बोलायचं कसं ? हा प्रश्न पडतोय त्यांच्यासाठी समाजबंध online प्रशिक्षण आयोजित करत आहे.

– प्रशिक्षण कार्यशाळा ही विनामूल्य असेल मात्र नावनोंदणी आवश्यक. केवळ २० जागा उपलब्ध. 

– प्रशिक्षण घेतलेल्या माध्यमिक शिक्षकांनी आपल्या शाळेतील किशोरवयीन मुलींसोबत ‘प-पाळीचा संवाद सत्र’ घेणे बंधनकारक. 

– ही एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा online असून रविवार,२३ मे रोजी होईल.

अधिक माहितीसाठी Whatsapp द्वारे संपर्क –

सचिन आशा सुभाष 7709488286

समन्वयक – समाजबंध सामाजिक संस्था

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %