*सकाळ माध्यम समूहाच्या “सकाळ एनआयई” (न्यूज पेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत* महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या व विविध प्रयोगांच्या तसेच विविध थेरपींच्या आधारे प्रभावी अध्यापन कसे करता येईल, या दृष्टिकोनातून *”मैत्री डिजिटल युगाशी” – शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा,* ही मार्गदर्शनपर मोफत ऑनलाईन झूम वेबिनार स्वरूपात मालिका सुरु करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून विविध मार्गदर्शकांचे मार्गदर्शन शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. *या मालिकेतील सातवी मार्गदर्शन कार्यशाळा “काळानुरूप बदलते शैक्षणिक उपक्रम आणि शिक्षकांचा दृष्टिकोन व भूमिका” याविषयी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. अमोल बागुल यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा गुरुवार ता. ( १०) जून रोजी , सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन झूम वेबिनार च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.*
डॉ. अमोल बागुल कमी वयात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील एकमेव व देशातील गुणानुक्रमाने पहिले शिक्षक आहेत. बागुल यांनी एकाच शैक्षणिक वर्षात सुमारे २७६ विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत, यामध्ये झिरो स्कूल बॅग पॅटर्न , आरसा वही , विद्यार्थी वर्गांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी नासा किड्स क्लब व सायन्स टॉईज बँक व ओपन पेपर डे असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.
डॉ. अमोल बागुल यांनी १७७ जागतिक विश्वविक्रमात सहभाग घेतला असून , २२ शैक्षणिक अँपची निर्मिती केली आहे. डॉ. बागुल वर्ल्ड टीचर फोरमच्या माध्यमातून १२१ देशांतील सुमारे पाच हजार शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या आदान – प्रदानासाठी प्रयत्नशील असून, त्यांनी २२ देशांच्या शैक्षणिक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. याखेरीज डॉ. बागुल यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे, यामध्ये ऐतिहासिक वस्तूंची स्वच्छता , गरजू व विशेष विद्यार्थ्यांना मदत , दुष्काळग्रस्त गावांना पाणी वाटप आदी उपक्रमांचा समावेश आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत व मतदारदूत म्हणून जनजागृतीचे काम करत आहेत.
*वेबिनारच्या माध्यमातून खालील प्रमुख बाबींवर मार्गदर्शन होईल.*
१. *शिक्षकांची सर्वांगीण ( मल्टी टास्किंग ) भूमिका कशी असावी* .
२. *शिक्षकांनी शैक्षणिक उपक्रमांना सामाजिक उपक्रमांची जोड कशी द्यावी.*
३ *. काळानुरूप बदलते शैक्षणिक संरचना , उपक्रम व धोरण यांना अनुसरून शिक्षकांनी स्वतःला अद्यावत कसे ठेवावे.*
४ *. आधुनिक – तंत्रज्ञानात्मक शिक्षण पद्धतीचा स्वीकार.*
५ *. शिक्षकांची भूमिका – चेंज मेकर , बदल घडविणारी असावी.*
वरील वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक ओपन करून रेजिस्ट्रेशन करू शकता. रेजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल. तसेच झूम सदस्य संख्या पूर्ण झाल्यावर इतरांना sakalnie या फेसबुक पेजवर वेबिनार लाईव्ह पाहता येईल.
*लिंक :-*
*अधिक माहितीसाठी संपर्क :- ९९२२९१३४७३* , *८३७८९९३४४६*
९५९५५४५५५५