0 0
Read Time:4 Minute, 2 Second


 #वाचन #समृद्धी #स्पर्धा मे २०२१


आॅक्टोबर 2020 पासून आपण वाचनसाखळी समूहातर्फे दर महिन्याला
“वाचनसमृद्धी स्पर्धा” आयोजित करीत आहोत.सर्व वाचकांसाठी ही स्पर्धा खुली आणि मोफत आहे.

*मे 2021*

*स्पर्धेसाठी_विषय*-
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर व लेखक भालचंद्र नेमाडे(दोहोंपैकी एक) यांच्या लेखन साहित्यावर लेख किंवा कविता लिहिणे.

 *स्पर्धेचे_नियम*

  १.लेख किंवा कविता स्वलिखित असावी.
  २.लेख लिहिताना  शब्दमर्यादा कमीतकमी १००० शब्द व जास्तीत जास्त १५०० शब्द असावी.
  ३.कविता लिहिताना शब्दमर्यादा  कमीतकमी १६ ओळी आणि जास्तीत जास्त २४ ओळी असावी.
   ४.लेख किंवा कविता  टाइप केलेलीअसावी.त्यामुळे भविष्यात सर्व लेखांचे एकत्रित पुस्तक प्रकाशित करणे सोपे जाईल.
   ५. लेख किंवा कविता लिहिताना सुरुवातीला वाचनसाखळी स्पर्धा असे लिहिणे अनिवार्य आहे.
   ६.लेख किंवा कविता मराठी किंवा हिंदी भाषेतच असावे.
   ७.स्वतःच्या रचनेखाली स्वतःचा नाव, पत्ता(पिनकोड सहित), #मोबाईल #नं.(#व्हाटस् #अॅप) आणि email id टाकणे आवश्यक आहे.
   ८.लेख किंवा कविता सादर करण्याची शेवटची तारीख३० एप्रिल २०२१ आहे.
   ९.लेख किंवा कविता खाली दिलेल्या व्हाट्स अॅप नंबर वर पाठवाव्या.सोबत एक फोटो पाठवावा.
7038239499,
9075527003
१०.आपले लेख आणि काव्य याचे परीक्षण लेखन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून करण्यात येईल.
   ११.स्पर्धेचा निकाल ३ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
 १२.प्राप्त झालेल्या लेखांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात येईल.
१३.प्राप्त झालेल्या कवितांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय   क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात येईल.
१४.पुरस्काराचे स्वरूप-
       प्रथम क्रमांक-पुस्तक भेट (३०१ रूपये किंवा  त्यापेक्षा जास्त किंमत )व प्रमाणपत्र.
      द्वितीय क्रमांक-पुस्तक भेट(२०१ रूपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमत) व प्रमाणपत्र
       तृतीय क्रमांक-पुस्तक भेट(१०१ रूपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमत) व प्रमाणपत्र
देण्यात येईल.
     स्पर्धेत लेख /कविता पाठविण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१आहे.
१५) *स्पर्धेकरिता किमान ९  किंवा त्यापेक्षा जास्त लेख आल्यास त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात येतील.*
 १६) *किमान ६ ते ८ लेख आल्यास प्रथम व द्वितीय असे दोनच क्रमांक काढण्यात येतील.*
१७) *किमान ३ ते ५ लेख आल्यास १ क्रमांक काढण्यात येईल.*
१८) *नियम क्रमांक १५,१६,१७ कविता निवड करताना देखील लागू असतील*

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %