Read Time:3 Minute, 5 Second
अहमदनगर शहर स्थापना दिवस आॅनलाईन साजरा करूया…
कोरोनामुळे शहराचा स्थापना दिन मागील वर्षी साजरा होऊ शकला नाही. यंदाही प्रशासकीय निर्बंध असल्याने कार्यक्रमांवर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे ‘स्वागत अहमदनगर’च्या माध्यमातून अाॅनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक गटात १०००, ७०० व ५०० रूपये व ३०० रूपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके व सन्मानपत्र देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके ज्ञानसंपदा स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित साठे यांच्या वतीने दिली जातील.
१)छायाचित्र स्पर्धा -: छायाचित्र स्पर्धेसाठी ‘माझ्या शहराचं वैभव’ हा विषय आहे.
२) चित्रकला स्पर्धा -: शहर व जिल्ह्यातील कोणत्याही एेतिहासिक वास्तू किंवा प्रसंगाचं चित्र चित्रकला स्पर्धेसाठी पाठवता येईल. कोणत्याही माध्यमात व आकारात हे चित्र काढता येईल.
३) प्रश्नमंजूषा स्पर्धा -: प्रश्नमंजूषा स्पर्धेत ३१ प्रश्न असतील. अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांपैकी तिघांची निवड सोडत पद्धतीने केली जाईल.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पंकज मेहेर (मोबाइल ९८९०९४९४१४) या व्हाॅटस्अॅपवर संपर्क साधावा. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत १५ मे आहे.