Read Time:1 Minute, 34 Second
Join live to watch 14% bigger and 30% brighter #supermoon, organized by Regional Science Centre, Bhopal a unit of National Council of Science Museums-NCSM, Ministry of Culture, Government of India
#supermoon2021
आज दिसणार ‘सूपर मून
अवकाशात आज २७ एप्रिलला एक विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून, वर्षातील पहिला सुपरमून असेल.
३० टक्के तेजस्वी
या वेळेस चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. पौर्णिमा २७ तारखेला असली तरी २६ आणि २८ या तिन्ही दिवशी चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल.
२६ मे रोजी सुपरमून
चंद्र आणि पृथ्वीमधील या वेळेस अंतर ३५,८,६१५ किमी असेल, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली. या वर्षीचे पृथ्वी-चंद्र सर्वाधिक कमी अंतर २६ मे २०२१ रोजी होणाऱ्या सुपरमूनच्या वेळी असेल.
२०५२ रोजी मोठा सुपरमून
२७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हेदेखील खूप कमी अंतराचे राहील. परंतु, पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. तर, ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वांत मोठा सुपरमून होणार आहे.