0 0
Read Time:4 Minute, 40 Second
🟪🟩🟧🟫⬛🟦
राष्ट्रपतींनी केले नगरच्या शिक्षकाचे कौतुक
🟦🟥⬛🟫🟪🟩
राष्ट्रपतींच्या वीस सेकंदांच्या संवादाने भारावले डॉ. बागूलराष्ट्रपतींच्या वीस सेकंदांच्या संवादाने भारावले डॉ. बागूल
🟥🟧🟩🟪🟫🟨
अहमदनगर-राष्ट्रपतींची वाट पाहत हातात गुलाब घेऊन उभे असलेले शिक्षक आणि पालक.. एवढ्यात राष्ट्रपतींच्या आगमनाने अमृत उद्यानामध्ये उत्साह संचारतो… राष्ट्रपतींना अभिवादन करण्यासाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांमध्ये डॉ.अमोल बागुल यांच्याजवळ जेव्हा राष्ट्रपती येतात तेव्हा मागील राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे प्राप्त पदक राष्ट्रपतींना डॉ.बागुल दाखवतात व ते पाहून राष्ट्रपती डॉ.बागुल यांचे कौतुक करतात व अजून अशी भरपूर पदके मिळवा व पुढे जा..असा शुभेच्छा संदेश व आशीर्वाद देतात…असे चित्र होते राष्ट्रपती भवनाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2023 निमित्त शिक्षक सन्मान उपक्रमाचे..
🟦🟫🟪🟩🟧🟥
🔴संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व फोटोसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.
https://bagoogle.in/7466-2/
🟤व्हिडीओसाठी👉https://youtu.be/Evq_zCIs9Gw?si=3nym7djLKYMvW2rS
🟪🟩🟧🟫⬛🟦
    5 सप्टेंबर 2023-राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या वतीने शिक्षकांसाठी सन्मान सोहळा उपक्रमाचे आयोजन आले होते.देशातील निवडक शिक्षकांमध्ये चार वेळा तीन मा.राष्ट्रपतींद्वारा तसेच एक मा.उपराष्ट्रपती व एक मा.पंतप्रधान मोदीजी,तसेच राष्ट्रपती भवन व इसरोद्वारा विशेष निमंत्रित व सन्मानित शिक्षक डॉ.अमोल बागुल यांची निवड झाली होती.त्याचे विशेष निमंत्रण बागुल यांना प्राप्त झाले होते. मा.राष्ट्रपती यांनी डॉ. बागुल यांच्याशी सुमारे २० सेकंद संवाद साधला.यामध्ये बागुल यांनी प्राप्त पारितोषिके व उपक्रमाचा थोडक्यात परिचय दिला.”राष्ट्रपतींच्या या अमूल्य भेटीमुळे अजून ऊर्जा मिळाली असून भविष्यात विविध शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक उपक्रमांमधून भारतीय विद्यार्थी घडवण्याचे काम अजून वृद्धिंगत करणार आहे.”असे प्रतिपादन बागुल यांनी केले.
🟦🟫🟪🟩🟧🟥
🟠विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.अथवा 9595 54 5555 या व्हाट्सअप क्रमांकाला आपल्या विविध ग्रुप मध्ये ॲड करू शकता.
🟦🟫🟪🟩🟧🟥
  राष्ट्रपती भवनातील राष्ट्रीय अमृत उद्यान येथे संपन्न झालेल्या विविध गुणदर्शन सादरीकरण,राज्य वैशिष्ट्ये सादरीकरण सांस्कृतिक सोहळा,शिक्षक कलाकृती सादरीकरण आदी उपक्रमांमध्ये डॉ बागुल यांनी सक्रिय सहभाग घेतला.तसेच राष्ट्रपती भवनातील राष्ट्रपती संग्रहालय,हर्बल 1 व 2 गार्डन,टॅक्टाइल गार्डन,बोन्साई गार्डन,आरोग्य वनम,मा.राष्ट्रपती अब्दुल कलाम ग्रंथालय व वाचनालय,पूर्व लॉन,सेंट्रल लॉन,लाँग गार्डन,सर्कुलर गार्डन,दोलायमान बालवाटिका,आध्यात्मिक उद्यान आदी ठिकाणच्या प्रदर्शनात देखील सक्रीय सहभाग घेतला .
🟥🟨🟪🟩🟫🟦
⚫डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी 👉http://bit.ly/3Bds6RA
🟦🟫🟪🟩🟧🟥

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %