1 0
Read Time:3 Minute, 38 Second
मा.राष्ट्रपती व मा.उपराष्ट्रपती यांच्या सोहळ्याचे डॉ.अमोल बागुल यांना विशेष निमंत्रण
——————————————
संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ग्रंथालय उत्सवात डॉ.बागुल यांचे हस्तलिखित प्रदर्शन
अहमदनगर-
      भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ग्रंथालय महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभहस्ते होणार आहे तसेच मा.उपराष्ट्रपती जगदीप धनखडजी  या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत.या राष्ट्रीय ग्रंथालय उत्सवाचे विशेष निमंत्रण येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक परितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना प्राप्त झाले असून या उत्सवात डॉ.बागुल स्वतःच्या हस्तलिखित तसेच नानाविध पुस्तक संकल्पनांचे विशेष प्रदर्शन प्रस्तुत करणार आहेत.
         दिल्लीमधील प्रगती मैदान येथे 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी दोन दिवशीय राष्ट्रीय ग्रंथालय महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे.मा.अर्जुन राम मेघवाल(कायदा आणि न्याय मंत्री स्वतंत्र प्रभार आणि सांस्कृतिक व संसदिय कामकाज राज्यमंत्री)यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून डॉ.बागूल येथील ग्रंथ प्रदर्शनामध्ये आपल्या कॅलिग्राफी तसेच हस्ताक्षरातील विविध साहित्यकृतींचे प्रदर्शन देखील प्रस्तुत करणार आहेत.या महोत्सवात विविध परीसंवाद,चर्चासत्रे,मुलाखती आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

        “भारतातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळख करून दिली जाणार आहे.ग्रंथालय महोत्सव 2023 हा ज्ञान आणि कल्पनेचा उत्सव आहे.ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि अमर्याद भविष्यातील दरी सांधतात.हस्तलिखितातील प्राचीन ग्रंथ ही देशाची संपत्ती आहे.आधुनिक व माहिती तंत्रज्ञान साधनाचा वापर करू नका पिढीची मानसिकता ओळखून त्यांच्या सोयीने ग्रंथातील ज्ञान पोहोचवणे हे महोत्सवाचे उद्दिष्ट आहे यामुळे भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढेल तसेच वाचन चालवलेला खरी गतिमानता ही प्राप्त होईल “असे मंत्रालयाने म्हटले आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
14 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
86 %