Read Time:4 Minute, 29 Second
“शिवाई ई-बस”चे राज्यातील पहिले मानाचे तिकीट डॉ.अमोल बागुल यांना पहिले वाहक केवटे यांच्या हस्ते प्रदान
—————————— ———-
शिवाई -2022 चे पहिले वाहक हेंद्रे यांनी केले वितरित
अहमदनगर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, राज्य परिवहन,अहमदनगर विभाग यांच्यावतीने नगर- पुणे येथून प्रस्थान करणारी राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस शिवाईचे 1948 रोजी नगर- पुणे धावलेल्या पहिल्या एसटीचे वाहक लक्ष्मण केवटे यांच्या शुभहस्ते राज्यातील पहिले मानाचे तिकीट दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना प्रदान करण्यात आले.आणि 1जून 2022 रोजी आत्ताच्या पहिल्या शिवाई ई -बसचे वाहक जयराम केंद्रे यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले.
पुणे येथून संपन्न झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये
विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग तसेच अहमदनगर-तारकपूर आगारामधील ऑफलाइन कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी संदीप निचित ,आयुक्त शंकर गोरे, महापौर रोहिणी शेंडगे, आरटीओ अधिकारी उर्मिला पवार, विजय गीते (विभाग नियंत्रक,नगर) अमोल आघाव( डेपो मॅनेजर) आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.अमोल बागुल यांनी या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन, रांगोळी रेखाटन ,सजावट व माहितीपट निर्मिती तसेच नियोजनामध्ये आपला सहभाग नोंदवला होता.
” शिवाई बसचे पहिले तिकीट माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.सर्वसामान्यांची पर्यावरण रक्षक एसटी म्हणून शिवाई चे स्थान अनन्यसाधारण आहे,प्रदूषण मुक्त पर्यावरणाच्या प्रचार-प्रसारासाठी या तिकिटाचा मी निश्चितच वापर करेल,हे तिकीट मी श्वासाच्या शेवटपर्यंत जपून ठेवेन, असे प्रतिपादन डॉ. बागूल यांनी केले.
१ जून २०२२ रोजी एसटी महामंडळ अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्याचे औचित्य साधत स्वारगेट येथे संपूर्ण विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या ‘शिवाई’ बसचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिवाई बस पुणे – नगर मार्गावर धावणार आहे. राज्यासाठी पर्यावरणपूरक असलेली शिवाई बस ही प्रदूषणविरहित, वातानुकुलीत व आवाजविरहित आहे.१ जूनपासून पुणे-नगर मार्गावर ही बस धावणार असून पहिल्या टप्प्यात १५० “शिवाई’ बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत.
संपूर्ण वातानुकूलित असलेली “शिवाई’ ही ई-बस एका पूर्ण चार्जिंग केल्यानंतर साधारणत: ३०० किलोमीटर धावते. त्यादृष्टीने ३०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील मार्गावर या बसेस सुरू करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-कोल्हापूर, बोरिवली-ठाणे, बोरिवली-पुणे आदी मार्गांवर या बसेस सुरू करण्यात येतील महामंडळाने सांगितले आहे.