🟦🟥🟩🟪⬛🟫
आंतरराष्ट्रीय G-20 परिषदेत डॉ.अमोल बागुल यांनी सादर केले डिजिटल सप्तक
🟩🟦⬛🟫🟪🟥
दक्षिण आफ्रिका व जपानच्या मंत्र्यांच्या शुभहस्ते डॉ.बागुल यांच्या सात वेबपेजचे उद्घाटन संपन्न
🟪🟥🟦🟩🟨🟧
अहमदनगर-भारताच्या आजादी का अमृत महोत्सव उपक्रमानिमित्त भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स,माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय व डिजिटल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुमारे 30 देशांच्या G20 आंतरराष्ट्रीय परिषदेत येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित उपक्रमशील शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी माहिती व तंत्रज्ञानातील नवा आविष्कार “डिजिटल सप्तक” हा उपक्रम सादर केला.आफ्रिकेच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री मोएस कुनकुयु कालोंगाशावा व जपानच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव खाकीबो लाँजसीवीले यांच्या शुभहस्ते डॉ.बागुल यांच्या सात वेबपेजचे उद्घाटन संपन्न झाले.
12 ते 14 जून 2023 या कालावधीत पुणे येथील हॉटेल जे.डब्ल्यू. मेरीएट येथे संपन्न झालेल्या व “वसुधैव कुटुंबकम” घोषवाक्य असलेल्या या आंतरराष्ट्रीय जागतिक परिषदेमध्ये डॉ. बागुल यांनी आपल्या डिजिटल सप्तक या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमामध्ये१)आर्टिफिशियल इंटेलिजन्स [AI],२)चॅट जीपीटी [CHAT GPT] ,३)सायबर सिक्युरिटी [CS] ,४)आग्युमेंटेड रियालिटी [AR ] व व्हर्चुअल रियालिटी [VR],५)रोबोटिक्स [RB],६)कोडींग [CD],७)इंटरनेट ऑफ थिंग्स [IOT]या सात घटकांची प्रस्तुत केली.30 देशांच्या अनेक प्रतिनिधींनी डॉ.बागुल यांचे कौतुक केले.माहिती घेऊन प्रश्न विचारले व अजून सुधारणेबद्दल देखील उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
🟦🟪🟫⬛🟨🟧
आफ्रिकेच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री मोएस कुनकुयु कालोंगाशावा व जपानच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव खाकीबो लाँजसीवीले यांच्या शुभहस्ते डॉ.बागुल यांच्या MY Ai,CHAT GPT Driver,Road TO Cod, Tricks and Robotics,IOT SARTHI,WE ARE AR &VR , let’s be CYBER WARRIOR या सात वेबपेजचे उद्घाटन संपन्न झाले.या सातही वेब पेजच्या कॉपीराईट,पेटंट, ट्रेडमार्क,iso साठी डॉ. बागुल यांनी नामांकने सादर केली आहेत.
🟥🟪⬛🟫🟩🟦
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟦🟪🟫⬛🟨🟧
तिसऱ्या G20 डिजिटल परिषदेच्या”जीवनातील सुलभतेसाठी डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा,व्यवसाय तसेच प्रशासनातील सुलभतेसाठी डिजिटल संरचना तयार करणे”या संकल्पनेवर आधारीत डॉ.बागुल यांनी डिजिटल सप्तक हा प्रकल्प सादर केला.शालेय तसेच सामान्य पातळीवर या नव्या युगाच्या सात डिजिटल कौशल्याला आपलेसे करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करता येईल व त्याचे मार्ग कोणते आहेत यासाठी कोणकोणत्या पात्रता शिक्षक-पालक-विद्यार्थी यांना प्राप्त करायला हव्यात. तसेच त्यासाठी असलेले स्त्रोत कोणते आहेत व त्यासाठी स्वतः केलेले कार्य याबद्दल डॉ. बागुल यांनी आपला प्रकल्प सादर केला.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ११ मे २०२३ निमित्त डॉ. बागूल यांच्या बागुगल वेबसाईटच्या वतीने “तंत्रभारती” ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.”स्कूल टू स्टार्टअप्स-इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट” या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन-२०२३ च्या संकल्पनेच्या अनुषंगाने व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षक-पालक-विद्यार्थी व तंत्रप्रेमींसाठी डॉ बागुल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. तसेच डॉ. बागूल करीत असलेल्या गुगल-मायक्रोसॉफ्ट-नासा एज्युकेटर व ऍप्पल टिचर म्हणून करीत असलेल्या मोफत शैक्षणिक कार्याची देखील दखल समितीच्या वतीने घेण्यात आली.
🟪🟥🟩🟦⬛🟫
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी 👉 http://bit.ly/3Bds6RA
🟫🟦🟧🟪🟥🟨