0 0
Read Time:6 Minute, 34 Second
🟥🟩🟪🟩🟦🟧
डॉ.अमोल बागूल यांची अहमदनगर महानगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियान २.० साठी स्वच्छता ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून निवड
🟥🟧🟨🟩🟦🟪
 स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये ३ कोटी भारतीयांना पाठवणार स्वच्छतेचे ई-साहित्य बुलेटीन
⬛🟫🟪🟦🟩🟨
अहमदनगर-पेयजल व स्वच्छता मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने आयोजित स्वच्छ भारत मिशन अभियान २.० अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ करीता अहमदनगर महानगरपालिका यांच्या वतीने येथील राष्ट्रपतीपदक-गिनिज-नासा सन्मान प्राप्त,सर्वाधिक पारितोषिक विजेते हरहुन्नरी कलाकार डॉ.अमोल सुभाष बागूल यांची  स्वच्छता ब्रॅण्ड अम्बेसेडर  म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यानिमित्ताने सुमारे ३ कोटी भारतीयांना स्वच्छतेचे ई-साहित्य बुलेटीन पाठवण्याचा डॉ.बागूल यांचा मानस आहे.भारत सरकारच्या आवास व शहरी मंत्रालयाच्या वतीने आयोजित कचरामुक्त शहर अभियानामधील स्वच्छोत्सव व स्वच्छाग्रही प्रतिज्ञा घेण्याच्या उपक्रमात अहमदनगर महानगरपालिकेला देशात प्रथम क्रमांक प्राप्त झाला तसेच नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने आयोजित शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये ड-वर्ग महानगरपालिका गटामध्ये अहमदनगर महानगरपालिकेस तृतीय क्रमांकाचे पाच कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.या दोन्ही महत्त्वपूर्ण उपक्रमात डॉ.बागुल यांचा अल्पसा सहभाग व योगदान होते.
🟩🟦🟪🟧🟥🟨
🟦डॉ.बागुल यांच्या स्वच्छताविषयक वेब पेजला👇 भेट द्या.
https://www.facebook.com/profile.php?id=100091734129489&mibextid=ZbWKwL
⬛🟫🟪🟦🟦🟩
🟦डॉ.बागूल यांनी जिल्ह्यातील सुमारे १५२ ऐतिहासिक वास्तूंची स्वतः स्वच्छता करून त्यातील अनेक वास्तूंवर २१००० दिव्यांच्या रोषणाईचा ऐतिहासिक दिवाळी हा उपक्रम राबविण्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शालेय स्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्हा स्वच्छता समितीसह सुमारे ८०,००० विद्यार्थ्याना स्वच्छतेविषयक प्रबोधन केले आहे.जि.प.च्या स्वच्छताकक्षाची सजावट, भुईकोट किल्ला स्वच्छता अभियानासह महानगरपालिकेच्या शहर-प्रभाग स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवला असून केंद्र सरकारचा स्वच्छता-ही-सेवा हा सन्मान देखील डॉ.बागूल यांना प्राप्त झाला आहे.नवी दिल्लीच्या राष्ट्रीय स्वच्छता केंद्रात उपक्रमांचा सहभाग ,विद्यार्थ्यांच्या मदतीने समर्थ शाळा स्वच्छ्ता, राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले स्वच्छतामित्र हे हस्तलिखित,स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ते २०२२ मधील स्वच्छता ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून उत्कृष्ट कामगिरी,स्वच्छता महोत्सवाचे आयोजन,माझी वसुंधरा अभियानातील सहभाग, स्वच्छतेच्या घंटा गाड्यांवरील उदघोषणा, स्वच्छता संदेश देणारा जगातील सर्वात मोठा मानवी साखळीतील म.गांधीजींचा चश्मा(स्वच्छता अभियान लोगो) विश्वविक्रमी उपक्रमातील सहभाग,हजारो सूत्रसंचालने,रांगोळी रेखाटने,उपक्रमातून स्वच्छता जनजागृतीच्या कामगिरीमुळे डॉ. बागूल यांची स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
🟪🟫🟦⬛🟩🟨
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟦🟪🟫⬛🟨🟧
🟦डॉ. बागूल यांना या कामी महापौर रोहिणी शेंडगे,आयुक्त पंकज जावळे,उपमहापौर गणेश भोसले,सर्व नगरसेवक,अधिकारी,पदाधिकारी तसेच मनपा स्वच्छता कक्ष मनपा स्वच्छता कक्षाचे स्वच्छ सर्वेक्षण प्रमुख परीक्षीत बिडकर,विभाग प्रमुख किशोर देशमुख,लक्ष्मण लांडगे यांचे सहकार्य डॉ.बागुल यांना लाभले आहे. समाज माध्यमांतील-सोशल मीडियातील सुमारे १२४ मेसेजिंग अँपच्या माध्यमातून केंद्राचे स्वच्छताअँप,स्वच्छता योजना,स्वच्छता सर्वेक्षण,स्वच्छतेची प्रतिज्ञा,स्वच्छतेची सप्तपदी,घोषवाक्ये,चित्र,निबंध, कविता,पथनाट्य,माझी स्वच्छता सेल्फी,व्हिडिओ आदी स्वच्छतेचे ई-साहित्य बुलेटीन डॉ.बागूल महिन्यातून दोनदा ऑनलाइन पाठविणार आहेत. स्वच्छताविषयक प्रचार,प्रसार व जनजागृतीसाठी स्वच्छता ब्रॅण्ड अम्बेसेडर नियुक्ती शासनामार्फत केली जाते.स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सुद्धा विविध नाविन्यपूर्ण व लोकसहभागाच्या उपक्रमांसह डॉ.बागूल सज्ज आहेत.
🟧🟥🟨🟩🟦🟪
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी 👉 http://bit.ly/3Bds6RA
🟫🟦🟧🟪🟥🟨
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %