0 0
Read Time:10 Minute, 12 Second

 

 

युनिसेफ ची कोविड लसीकरणाविषयी प्रश्नोत्तर स्वरुपात माहिती.

https://www.unicef.org/coronavirus/what-you-need-to-know-covid-vaccine

लस घेण्याआधी

लस घेण्याआधी तुम्हाला याबाबत थोडी माहिती घेणे आवश्यक आहे. लसीचे काही साईड इफेक्ट असेल तर त्याबाबत जाणून घ्यावे तसेच लसीकरण केंद्रावर जाताना नाक आणि तोंड पूर्णपणे बंद राहील असा मास्क वापरावा. लस घेण्याआधी तुमच्याकडे सॅनी टायझर आणि तुमचे मूळ ओळखपत्र/एखादी झेरॉक्स स्वतःबरोबर आहे याची खात्री करा.तुमच्या आधीच्या औषधांमुळे तुम्हा रिएक्शन किंवा ऍलर्जी होत असेल तरच लस घेण्याआधी डॉक्टरांना सांगा.


लस घेण्यापूर्वी 

लस घेण्यापूर्वी कोरोनाची लक्षणे दिसली तर तुम्हाला  कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही अथवा लस घेण्यापूर्वी अशी काही लक्षणे आढळून आल्यास लस घेणे तूर्तास रद्द करा .लसीकरण केंद्राला याबाबत फोन किंवा मेसेज करून कळवा तसेच कोरोनातून पूर्णपणे सावरल्यानंतर 14 दिवसांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कोरोनाची लस घेऊ शकता.

पुरेशी विश्रांती (Rest) :

 लस घेण्यापूर्वी शरीराला विश्रांती आवश्यक असते. लस घेण्यापूर्वी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तयार असणं आवश्यक असतं. लस घेण्याच्या आदल्या दिवशी किमान सहा ते आठ तास झोप घ्यावी. लस घेण्याच्या दिवशी जास्त व्यायाम करू नये.

स्टेरॉइड्स (Steroids) : 

तुम्हाला काही स्टेरॉइड औषधं सुरू असतील, तर लसीकरणापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, अतिसार अशी लक्षणं लस घेण्यापूर्वी दिसत असतील, तर आधी वैद्यकीय सल्ला घ्या.

आहार

प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन देईल असा आहार घ्या. संतुलित आहार योग्य ठरेल. भरपूर पाणी पिणंही आवश्यक.

लस घेण्याच्या दिवशी :

सुरक्षितता: मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शिल्ड घालून लसीकरणाला जा. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांची सुरक्षितताही राखली जाईल. आवश्यकतेनुसार सॅनिटायझरचा वापर करावा.

लसीकरण केंद्रावर अशी घ्या काळजी 

लसीकरण केंद्रावर तुमचा नंबर येईपर्यंत मास्क लावून ठेवा आणि चेहऱ्याला सतत हात लावू नका. लसीकरण केंद्रामध्ये आलेल्या लोकांपासून तुम्ही एक- दीड मीटर अंतर ठेवा. केंद्रावरील दरवाजा, दरवाज्याचे हॅन्डल, खुर्ची यांना हात लावल्यास हात सॅनीटाईज करायला विसरू नका.

लस घेताना

लस घेताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि खरी माहिती सांगा .लस घेताना सुई टोचल्याने थोड्या वेदना होतील मात्र त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे

घट्ट कपडे नकोत : 

लस घ्यायला जाताना आरामदायी कपडे घालावेत. घट्ट कपडे घालू नयेत. तसंच लशीचं इंजेक्शन खांद्यावर घ्यायचं असल्याने त्याचा विचार करून कपडे घालावेत.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नक्की सांगा

लस घेतल्यानंतर काही मध्ये ऍलर्जी किंवा तीव्र साइड इफेक्ट्स दिसून आले आहेत. खाज येणे ,ओकारी, घबराट होणे, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ सांगा. लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट जवळपास तीस मिनिटांनी दिसू शकतात. त्यामुळे लस घेतल्यावर लसीकरण केंद्रामध्ये तीस ते चाळीस मिनिटं आवर्जून थांबा

दुसरा डोस घ्यायला विसरू नका

पहिला डोस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची तारीख नक्की विचारून घ्या तसेच ही लस घेतल्यानंतर अन्य कोणत्या आजाराची लस अथवा औषधे याबाबत  डॉक्टरांशी संपर्क साधा

पाणी प्या (Hydration) :

 भरपूर पाणी प्यायल्यामुळे ताजंतवानं राहायला मदत होते. डिहायड्रेशन झालं तर थकल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं वाटू शकतं.

सकारात्मक विचार (Positive Thoughts) :

 लस घेण्याच्या दिवशी तुम्हाला टेन्शन आलं असेल,तर सकारात्मक विचार करा, अशा विचारांच्या सान्निध्यात राहा. दीर्घश्वास घ्या किंवा शांत संगीत ऐका. तुम्ही तुमचं आणि आजूबाजूच्यांचं आयुष्य वाचवण्याच्या एक पाऊल जवळ जात आहात, याची आठवण स्वतःला करून द्या.

लस घेतल्यानंतर

स्वतःवर लक्ष ठेवा : लशीचे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता दुर्मीळ असते. तरीही लस घेतल्यानंतर स्वतःमध्ये कोणती लक्षणं जाणवत आहेत, यावर लक्ष ठेवावं. उलट्या, चक्कर येणं, अॅलर्जी, खाज सुटणं अशी गंभीर लक्षणं दिसत असतील, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

अल्कोहोल नको (No Alcohol) :

 याबद्दल नेमका अभ्यास झालेला नाही. तरीही लस घेतल्याच्या दिवशी मद्यपान करणं टाळावं. तरीही तुम्हाला करायचंच असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि मर्यादित प्रमाणातच करावं.

वैद्यकीय सल्ला

कोणतीही गोळ्या-औषधं घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

पेनकिलर्स नकोत (No Painkillers) : तुम्हाला लसीकरणानंतर कोणतीही लक्षण दिसत नसतील, तर पेनकिलर्स घेणं टाळावं. त्यामुळे तुमच्या प्रतिकार यंत्रणेत ढवळाढवळ होऊ शकते आणि काही साइड इफेक्ट्स दिसू शकतात.

दुसऱ्या डोसची तयारी : 

पहिला डोस घेतल्यानंतर चार ते12 आठवड्यांच्या दरम्यान लशीचा दुसरा डोस घेणं गरजेचं आहे. डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, यासाठी डॉक्टर्सचं मार्गदर्शन घ्यावं.

दुसरा डोस घ्यायला विसरू नका

पहिला डोस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची तारीख नक्की विचारून घ्या तसेच ही लस घेतल्यानंतर अन्य कोणत्या आजाराची लस अथवा औषधे याबाबत  डॉक्टरांशी संपर्क साधा

घरी आल्यावर अशी घ्या काळजी 

लस घेतल्यानंतर घरी आल्यावर तुमच्या आहारावर फोकस करा .पाण्याचे योग्य सेवन करा .फास्टफूड अथवा बाहेरचे जेवण घेणे काही दिवस टाळा.तसेच लस घेतल्यानंतर स्नायूंमध्ये वेदना जाणवत असल्यास काही दिवस व्यायाम करणे किंवा ताकदीचे काम करणे काही दिवस टाळा तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्यांचे सेवन करू नका.

व्यसनांपासून लांब राहा

जर तुम्ही व्यसन करत असाल तर लसीकरणानंतर काही दिवस यापासून लांब राहण्याची नितांत गरज आहे त्याचबरोबर तळलेले पदार्थ, अति मसालेदार पदार्थ यापासून देखील लांब राहा

कामाला सुरुवात

लस घेतल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करू नका. दोन ते तीन दिवस आराम करा लस घेतल्यानंतर 24 तासांमध्ये इफेक्ट्स दिसायला कदाचित सुरुवात होते म्हणूनच लस घेतल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन दिवस आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.

काळजी घेणं सुरूच ठेवावं :

 लस घेतली म्हणजे कोरोना संसर्गाचा धोका नाही असं समजू नये. मास्क आणि अन्य संरक्षक साधनांचा वापर करतच राहावा. सॅनिटायझेशनही करावं. तुम्हाला संसर्ग झाला नाही,तरी तुम्ही वाहक होऊ शकता, हे ध्यानात ठेवावं. त्यामुळे सर्वांनी एकमेकांचं रक्षण करावं.

कोरोना लसीकरणाविषयी सर्वंकष माहिती

https://www.studycircleonline.com/expert-speak/—61/254





Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %