Read Time:13 Minute, 18 Second
भारतीय शिक्षक दिन विशेष -5 सप्टें 2021
🟪
अफगाणिस्तानातील शिक्षक सुरक्षेसाठी नगरच्या शिक्षकाने मागितली शेकडो जागतिक संघटनांकडे दाद
🟪🟪🟪🟪🟪🟪
डॉ.अमोल बागुल यांची वर्ल्ड टीचर फोरमच्या माध्यमातून अफगाणी शिक्षक-विद्यार्थी यांच्या भविष्य व सुरक्षेसाठी “मिशन अफ्युचर” मोहीम
🟥🟥🟥🟥🟥🟥
अहमदनगर-
सध्याची अफगाणिस्तानातील युद्धजन्य परिस्थिती व भीषण मानवसंहार पाहता अफगाणी शिक्षक-पालक-विद्यार्थी व शिक्षण क्षेत्र यांच्या भविष्य व सुरक्षेसाठी येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी वर्ल्ड टीचर फोरमच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गेल्या वीस दिवसांपासून अफगाणिस्तानातील विविध शिक्षक,विद्यार्थी, शिक्षणसंस्था,शिक्षकसंघटना,शाळा ,विद्यापीठांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत ऑनलाइन संपर्क ठेवून अनुभवलेली विदारक स्थिती पाहता डॉ. बागूल यांनी विविध देशांच्या शेकडो जागतिक संघटनांकडे अफगाणी शिक्षण क्षेत्राच्या सकारात्मकतेसाठी दाद मागितली आहे.
🟧🟧🟧🟧🟧🟧
“वेटिंग फॉर सनराइज” या टॅगलाइनने काम करणाऱ्या डॉ. बागुल यांच्या “मिशन ऑफ अफ्युचर”अंतर्गत तेथील हाताबाहेर गेलेली परिस्थिती पाहता डॉ. बागुल यांनी 15 ऑगस्ट 2021 पासून तेथील शिक्षण घटकांशी गूगल मीट,झूम,व्हाट्सअप व्हिडीओ-व्हाईस कॉल या माध्यमातून शेकडो शिक्षकांशी संपर्क ठेवला व विविध प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांचे मानसिक समुपदेशन,आरोग्याची विचारपूस तसेच धीर व धाडस देण्याचे काम फोरम टीमच्या माध्यमातून होत आहे.यासाठी दूभाषिक व अनुवादकांची मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.WHO व UNICEF च्या ऑनलाईन स्वयंसेवकाच्या कामाचा अनुभव डॉ.बागूल यांना या मिशनसाठी कामी येत आहे.
🟪🟪🟪🟪🟪🟪
सुमारे दहा वर्षांपूर्वी डॉ.बागुल यांनी वर्ल्ड टिचर फोरमची स्थापना केली.या माध्यमातून शेकडो देशातील हजारो शिक्षक या उपक्रमाशी जोडले गेले.यात अफगाणी शिक्षक देखील होते.कोरोना प्रतिकूलता कालावधीमध्ये डॉ. बागुल यांच्या ई- लोक शिक्षा अभियानामध्ये या देशातील पालक,विद्यार्थी देखील सहभागी झाले.
⬛⬛⬛⬛⬛⬛
हेही बघा👍
https://youtu.be/ufo6co42oWw जागतिक स्तरावर सर्वाधिक पारितोषिके मिळविणाऱ्या शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास… शिक्षकदिन विशेष डॉक्युमेंटरी निर्मिती- प्रसिद्ध चित्रपट-लघुपट निर्माते- श्री कृष्णा बेलगावकर-ALL THE BEST-THE PUBLIC BROADCAST
🟪🟪🟪🟪🟪🟪
गेल्या वीस दिवसात संपर्कात असलेल्या हजारोंची संख्या शेकडोंवर व शेकडोंची संख्या दोन अंकी आकड्यांवर आली आहे तसेच संपर्कात असलेल्यांपैकी विशेष करून महिला शिक्षिका व मुली या जणू गायबच झाल्या आहेत असे डॉ.बागुल यांनी खेदाने नमूद केले आहे.कुठेही नाव येणार नाही अशा अटीवर शिक्षक व शिक्षक संघटना सध्या बोलत आहेत.त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मदत करता येणे शक्य नाही.तेथील घटकांचे प्रतिनिधींशी मदतीसाठी याचना करणे,रडत बोलणे व ऑनलाइन कॉलवर दिसणारा माणूस नंतर परत कधी दिसेल की नाही या भावनेने प्रतिनिधींचे देखील डोळे भरून आले.अफगाणिस्तान या शब्दातील “अफ” व “फ्युचर”(भविष्य) हे दोन शब्द मिळून “अफ्युचर” हा मिशनसाठीचा शब्द तयार करण्यात आला आहे,असे डॉ.बागूल यांनी सांगितले.
🟧🟧🟧🟧🟧🟧
डॉ. बागुल यांनी भारताचे महामहीम राष्ट्रपती,मा.पंतप्रधान,परराष् ट्रमंत्री, दोन्ही देशांमधील राजदूत तथा दूतावास अधिकारी यांच्यासह विविध देशांच्या विशिष्ट हेतूसाठी एकत्र आलेल्या सुमारे 100 जागतिक संघटनांशी पत्रव्यवहार करून परिस्थितीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहून आपण योग्य ती पावले उचलावीत असे आवाहन करून अफगाणी शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षण क्षेत्र यांचे भविष्य व सुरक्षेविषयी याचना केली आहे.
🟪🟪🟪🟪🟪🟪
हे ही ऐका👍
5 सप्टेंबर 2021राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त अहमदनगर आकाशवाणीवर
डॉ.अमोल बागुल यांची कोरोना काळातील ज्ञानदानामध्ये शिक्षकांचे योगदान या विषयावरील मुलाखतकार मा. सुदाम बटुळे साहेब यांनी घेतलेली मुलाखत
प्रसारण रविवार दि.5 सप्टेंबर 2021
सकाळी 7=40 वा.आकाशवाणी अहमदनगर 100.1MHz वर आणिNewsOnAIR मोबाईल ॲपवर
🟥🟥🟥🟥🟥🟥
त्याचबरोबर डॉ बागुल यांनी विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय संघटना व त्यांची कार्ये यांचा अभ्यास करून पुढील विविध जागतिक संस्थांशी ऑनलाईन पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्येवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन,युनिसेफ, संयुक्त राष्ट्र संघ,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ,जी 20,जी 8,सार्क,जागतिक व्यापार संघटना, द नोबल फाउंडेशन, मलाला फाउंडेशन, नाफ्टा,बिमस्टेक ,ब्रिक्स,राष्ट्रकुल परिषद,शांघाय सहकार्य संघटना,संयुक्त राष्ट्रसंघ,अरब संघ, अलिप्त राष्ट्रगट चळवळ,आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ,आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना,आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय,आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना,आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ,आफ्रिकन संघ,आफ्रो-आशियाई परिषद,आय.ए.आर्थिक सहयोग व विकास संघटना,आसियान,इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर,टोस्ट मास्टर्स,इंटरनॅशनल दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना,ब्रिक, युरोपाची परिषद,लीग ऑफ नेशन्स,नाटो,मुस्लीम संघटना,युरोपियन संघ,विमान कंपनी संघटना,आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब, यंग मेन्स/वुइमेन्स ख्रिश्चन असोसिएशन ,आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब,आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल,युनिव्हर्सल पोस्टल युनियन,आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद,इंडियन ओशन रिम असोसिएशन फॉर रीजनल को-ऑपरेशन,संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद,आंतरराष्ट्रीय कामगार संघटना,इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन,आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ,युनायटेड नेशन्स कन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट,जागतिक बौद्धिक संपदा संघटना,जागतिक हवामान संघटना, मेडिसिन्स फॉर फ्रंटियर्स परिषद,वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर,असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स,इस्लामिक सहकार्याची संघटना,आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल,आंतरराष्ट्रीय सागरी संस्था, युरोपियन बँक फॉर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट,इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईन नेम अँड नंबर,आंतरराष्ट्रीय हायड्रो ग्राफिक्स संघटना,संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र महिला परिषद,संयुक्त राष्ट्र बाल निधी,संयुक्त राष्ट्रांचा लोकसंख्या निधी,संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना,आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे सुरक्षा परिषद,कृषी विकासासाठी आंतरराष्ट्रीय निधी, एशिया पॅसिफिक इकॉनोमिक ऑपरेशन इकॉनॉमी परिषद,जागतिक पर्यटन संस्था, जागतिक बुद्धिबळ महासंघ,जागतिक आर्थिक मंच,आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ,राष्ट्रांचे राष्ट्रकुल,आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना इंटरपोल, आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ,आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय,आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था, पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेक,ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स,संयुक्त राष्ट्र विद्यापीठ,संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था,सर्वसमावेशक अनुचाचणी बंदी करार संस्था,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी,जागतिक बँक, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन,बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सी,इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, इंटरनॅशनल बँक फॉर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट,जागतिक पर्यावरण सुविधा परिषद ,इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाईड केमिस्ट्री,आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था,आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्था,आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आदी विविध क्षेत्रात कार्य करणार्या जागतिक संस्था-संघटनांचा समावेश आहे.
🟦🟦🟦🟦🟦🟦
भविष्यात अफगाणिस्तानमध्ये तयार होणाऱ्या संभाव्य सरकारशी देखील भारताचे परराष्ट्र मंत्रालय व दोन्ही दूतावास यांच्या माध्यमातून याबाबतीत पत्रव्यवहार करण्याचा डॉ.बागुल यांचा मानस आहे.
🟩🟩🟩🟩🟩🟩
अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल यांच्याशी +91 9595 54 5555 या क्रमांकावर व amolbagul3@gmail.com या जीमेलवर आपण संपर्क साधू शकता.
🟥🟥🟥🟥🟥🟥
हेही पाहा 👍
लेट्सअप मराठीने शिक्षक दिनानिमित्त डॉ.अमोल बागुल यांच्या विविध कार्यावर तयार केलेली डॉक्युमेंटरी निश्चित पहा.
🟥🟥🟥🟥🟥🟥