शिक्षकाने बनवला ५०० गॅझेट्सचा “आयसीटी गणेशा”
🟪🟪🟪🟪🟪🟪
शिक्षणमंत्री नामदार मा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन
🟥🟥🟥🟥🟥🟥
अहमदनगर –
कोरोना प्रतिकूलता कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण,वर्क फ्रॉम होम तसेच ऑनलाइन उपकरणांचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले. याच ऑनलाईन जीवन पद्धतीला पुढे नेणाऱ्या सुमारे 500 पेक्षा जास्त गॅजेट्स तथा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कलात्मक सजावटीतून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागूल यांनी “आयसीटी गणेशा”ची निर्मिती केली असून याचे ऑनलाइन उद्घाटन नामदार मा. वर्षाताई गायकवाड (मा.शालेय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
अमोल बागूल,अमोल बागुल फॅन क्लब या नावाच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल वर या उपक्रमाचा व्हिडिओ सर्वांना पाहावयास उपलब्ध होणार आहे.डॉ. बागुल यांनी “आयसीटी गणेशा आरती”चे देखील लेखन केले आहे.प्रसाद म्हणून गणेशभक्तांना डॉ.बागुल लिखित “माय आयसीटी गाईड” हे कॉफीटेबल बुक दिले जाते.
२५ मार्च २०१९ पासून डॉ.बागुल यांनी ऑनलाइन शिक्षणाचे ई-लोक शिक्षा अभियान सुरू केले.याच इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून स्टडी फ्रॉम होम पॅटर्न,आयसीटी बॉस,राष्ट्राचे शिल्पकार,ई-टीचर क्लब, समर आर्ट कॅम्प यासारख्या उपक्रमांचे ऑडिओ,व्हिडिओ,पीडीएफ,तथा अन्य ई – शैक्षणिक साहित्य स्वरूपात सुमारे ८००० पेक्षा जास्त व्हाट्सअपग्रुप मधून डॉ.बागुल यांनी पाठवले.
कोरोना प्रतिकूलता कालावधीतील सुमारे दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू राहावे म्हणून विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तथा उपकरणे डॉ. बागुल यांनी गरजेनुसार विकत घेतली तसेच विविध देशातील शिक्षक मित्रांकडून उपलब्ध देखील केली.डॉ.बागुल यांनी अनेक वेबसाईटस्, ब्लॉग्स व ॲप्स ची निर्मिती केली आहे.
डॉ.बागूल यांना या उपक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री-उदय सामंत ,राज्यमंत्री ओम प्रकाश कडू,शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी,शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे,जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील,शिक्षणाधिकारी (माध्य.)अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री. धनवे,मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार,समन्वयक अरुण पालवे,श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,शालेय समिती चेअरमन ॲड किशोर देशपांडेआदी मान्यवरांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या आहेत.
अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल यांच्याशी +91 9595 54 5555 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.