🟥🟥🟥🟥🟥🟥
मतदार नोंदणीसाठी २७ व २८ नोव्हें २०२१ या दोनदिवसीय विशेष मोहिमेत सहभागी व्हा.
1नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबविली जात आहे,
मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम
- प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी:1 नोव्हेंबर 2021
- प्रारूप मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करणे:30 नोव्हेंबर 2021
- दावे व हरकती निकाली काढणे:20 डिसेंबर 2021 पर्यंत
- अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी:5 जानेवारी 2022
आपण हे करू शकतो
- विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे
- 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती नाव नोंदवू शकते
- आपल्या संबंधित मतदार याद्यांतील दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील
- आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील
- एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असल्यास पत्यात बदल करावा
- आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे
- नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकाल
मतदार नाव नोंदणी कुठे कराल?
- ऑनलाईन नाव नोंदणीसाठी–www.nvsp.in
- छापील अर्जाद्वारे नाव नोंदणी- मतदान केंद्र किंवा अन्य निर्देशित ठिकाणे
मतदार नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने
- प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास: अर्ज क्र. 6
- अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी: अर्ज क्र. 6अ
- इतर नावाबाबत आक्षेपासाठी,स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी: अर्ज क्र. 7
- मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी: अर्ज क्र. 8
- एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास: अर्ज क्र. 8अ
मतदार नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे
निवासाचा दाखला (कोणताही एक)
- जन्म दाखला
- भारतीय पारपत्र
- वाहन चालक परवाना
- बँक/ किसान/ पोस्ट पासबूक
- शिधावाटप पत्रिका
- प्राप्तिकर निर्देशपत्रिका
- पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक
- टपाल खात्याद्वारे प्राप्त टपाल/ पत्र
वयाचा दाखला (कोणताही एक)
- भारतीय पारपत्र
- वाहन चालक परवाना
- पॅन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- 12 वी,10 वी, 8 वी किंवा 5 वीची गुणपत्रिका
- आधार कार्ड
- 21 वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-3
ऑनलाईन नाव नोंदणीसाठी
- कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत
- कागदपत्रांची व छायाचित्राची फाईलJPG/ JPEG असावी
भारत निर्वाचन आयोगानुसार 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेला भारतीय नागरिक मतदान करु शकतो.ज्यांचे वय 1 जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्ष पूर्ण झाले आहेत ते मतदान करु शकतात.
अशा प्रकारे मतदान यादीत आपल्या नावाचा समावेश करा
जर तुम्ही नवी मतदान कार्ड बनवत असाल, तर तुमच्याकडे स्वत:चा ईमेल आयडी आणि फोन नंबर असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर www.nvsp.in वर जावे लागेल.
वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला FORM 6 पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला लक्षपूर्वक भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्ही जी काही माहिती भरणार त्याच्या आधारावर तुमचे मतदान कार्ड बनणार. यामध्ये तुमचा फोटो, वय, EPIC नंबर, घरचा पत्ता, जन्म तारीख, वय, लिंगसह इतर माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.
स्टेपनुसार फॉर्म कसा भरणार
- फॉर्म 6 ओपन झाल्यानंतर भाषा निवडा.
- जर तुम्ही मराठी भाषा निवडली तर तुमच्या राज्याचे नाव निवडा.
- विधासभा आणि लोकसभा क्षेत्राचे नाव निवडा, यासोबत तुमचा जिल्हा निवडा.
- यानंतर महत्त्वाची माहिती नाव, वय आणि पत्ता भरा.
- फोन नंबर आणि कुटुंबातल्या सदस्यांची माहिती भरा. ज्यांच्याकडे पहिल्यापासून मतदान कार्ड असेल.
- जर तुम्ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर आहात आणि तुमच्या घराचा पत्ता बदलला आहे. तर तुम्हाला फॉर्म 8 भरावा लागणार आहे.
- तुम्हाला फॉर्ममध्ये एक स्टार असलेला कॉलम दिसेल, तो कॉलम भरणे अनिवार्य असेल
- यानंतर तुम्हाला मागितलेले डॉक्यूमेंट्स स्कॅन करुन अपलोड करावे लागतील. पत्त्याचा पुरावा , ओळख पत्रामध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची प्रत अपलोड करावी लागेल.
- आता तुमचा ईमेल आयडी आणि फॉर्म भरण्याची तारीख टाका.
- एकदा भरलेला फॉर्म पुन्हा तपासून पाहून सबमिट करा.
जर फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चूक झाली, तर अर्ज केल्यानंतर 15 दिवसानंतरही तुम्ही सबमिट केलेल्या फॉर्ममध्ये बदल करु शकता
निवडणूक हा लोकशाहीचा सण मानला जातो आणि सामान्य माणसाच्या ‘मता’ला शस्त्र म्हणतात. पण मतदान करण्यासाठी काही नियम बनविले आहेत. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती मतदान करू शकते, परंतु त्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र एक रुपयाही खर्च न करता घरी बसून बनवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे मतदार ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचवले जाईल. त्यामुळे मतदार ओळखपत्र ऑनलाइन करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
अर्ज कसा करावा
जर तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही सहजपणे मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कोणताही पत्ता पुरावा असणे आवश्यक आहे. तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, तुम्ही या लिंकवरून थेट राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://nvsp.in/ वरही जाऊ शकता. येथून तुम्हाला नवीन मतदार / मतदार म्हणून रजिस्टरवर क्लिक करावे लागेल आणि येथे स्वतःची नोंदणी करून फॉर्म भरावा लागेल.
ही कागदपत्रे हवी आहेत
ऑनलाईन मतदार ओळख नोंदणीसाठी तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी, कोणत्याही आधार कार्डची स्कॅन कॉपी, बँक पासबुक, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील. या व्यतिरिक्त, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक असेल.
आयडी कार्ड घरी पोहोचेल
जर तुम्ही निवडणूक आयोगाच्या या पोर्टलवरून मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केला, तर सुमारे 1 महिन्यानंतर मतदार ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचते. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी तुमच्याकडे संगणक असणे देखील आवश्यक नाही, तुम्ही त्यासाठी तुमच्या मोबाईल फोनवरून अर्जही करू शकता.
हे देखील कार्य करू शकते
निवडणूक आयोगाच्या या साईटवरून तुम्ही आधीपासून तयार केलेले मतदार ओळखपत्रही डाउनलोड करू शकता. याशिवाय, आपल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती देखील येथून मिळू शकते. जे नवीन मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी करतात ते या पोर्टलवरून त्यांच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकतात. तसेच नवीन ओळखपत्र बनण्यासाठी सुमारे एक महिना लागतो.