*शोध चिंटूच्या आवाजाचा*
*चिंटूचे ऑडिशन स्क्रिप्ट* :
“त्या दिवशी मला गणिताच्या पेपरचं जरा टेन्शन आलं होतं, ते मी आई पप्पांना सांगितलं तर ते म्हणाले, “एवढासा तर आहेस तू चिंटू, तुला कसलं आलंय टेन्शन!” आता यांना कसं समजावू मी, की किती टेन्शन्स असतात मला! मोठी माणसं अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून सतत मागे लागलेली असतात त्याचं टेन्शन! आईनी अचानक डब्यात पडवळाची भाजी दिली तर काय, याचं टेन्शन! मिनीनं तिची एखादी कविता ऐकवली तर काय, याचं टेन्शन! जोशीकाकूंच्या बागेतल्या कैऱ्या पळवण्याचं टेन्शन, नव्या खेळण्यासाठी पप्पांकडे हट्ट करण्याचं टेन्शन, राजूशी सतत होणाऱ्या भांडणांचं टेन्शन! परीक्षेचं, अभ्यासाचं, याचं, त्याचं…किती किती टेन्शन्स! बापरे! आणि म्हणे लहान मुलांना टेन्शन्स नसतात!
आम्हा लहान मुलांची मोठीमोठी टेन्शन्स मोठ्यांना कशी कळणार! जाऊदे, आता मीही याचा विचार करायचा सोडूनच देतो! त्यापेक्षा पप्पांकडे नवीन खेळणं कोणतं मागायचं याचा विचार करतो…idea! सतीश दादाच्या बाईक सारखी खेळण्यातली बाईक मला हवीच आहे किती दिवसांपासून. आता संध्याकाळी पप्पा आले की त्यांना सांगतोच! अरे बापरे, समोरून मिनी येतेय आणि तिच्या हातात कसलातरी कागद दिसतोय…नक्की कविता असणार! मी पळतोSSS”
तुमची Audition *ऑडिओ फाईल* (mp3) फक्त
https://snovel.in/audition
वर शुक्रवार २१-मे-२०२१ रात्री ११:५९ पर्यंत upload करा.
*Project Name – Chintoo*
अधिक माहितीसाठी sound@snovel.in वर संपर्क साधा.
*परीक्षक: चारुहास पंडित, श्रीरंग गोडबोले, स्पृहा जोशी*
टीप: ऑडिशन फाईल ई-मेलवर स्वीकारली जाणार नाही
छान प्रॅक्टिस करा , all the best !
#snovel #audiobooks #podcasts #chintoo #chintuklyagoshti #outnow #callforartists #voiceover #audition #childrenvoice #listening #stories #books #download