1 0
Read Time:5 Minute, 58 Second

समर्थ देशभक्तीच्या रॅलीने दुमदुमले सावेडी उपनगर

🟦🟦🟦🟦🟦🟦

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या चार शाळांचा सहभाग

🟪🟪🟪🟪🟪🟪
अहमदनगर
देशभक्तीपर गीतांचा घुमणारा प्रेरणादायी आवाज, देशाला उभे करणाऱ्या महापुरुषांच्या वेशभूषेतील बालक बालिका, लेझीमच्या पाच पावली वर फेर धरणाऱ्या तिरंगी वेशभूषेतील मुली, ढोल ताशांच्या गजरात फडकणारा हाताहातामधला तिरंगा, देशभक्तीपर घोषणा आणि उजळणारे चेहरे, महापुरुषांच्या प्रतिमांचे फलक हातात धरून नगरकरांना देशसेवेचा अनोखा संदेश देणारी मुले, तिरंग्यासह उत्साहाने संपूर्ण रॅलीभर घोषणा देणारे शिक्षक- पालक… देशभक्तीपर फलकांनी सजवलेला समर्थरथ…असे चित्र होते श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या चार शाळांच्या वतीने आयोजित समर्थ देशभक्तीच्या रॅलीचे...
🟩🟩🟩🟩🟩🟩
🟥संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व फोटोसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.
https://bagoogle.in/2044-2/
🟦 व्हिडीओसाठी👉 https://youtu.be/DfQN0kb4Hhk
🟫🟫🟫🟫🟫🟫
    निमित्त होते वैभवशाली भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे.. स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरे होत असताना अहमदनगरमधील विद्यादानाचा यशस्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला(सावेडी)बाल आनंदवनभुवन बालवाडी विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने आयोजित समर्थ देशभक्तीच्या रॅलीने सावेडी उपनगर दुमदुमले. प्राचार्य तथा मुख्याध्यापिका श्रीमती संगीता देवधर-जोशी( माध्यमिक), मुख्याध्यापक श्री दुर्योधन कासार( प्राथमिक), पर्यवेक्षिका सौ संगीता सोनटक्के(माध्यमिक) आदी मान्यवरांनी या समर्थ देशभक्तीच्या रॅलीचे उत्कृष्ट नियोजन केले होते. सुमारे 1000 शिक्षक-पालक-विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तोफखाना पोलीस ठाणे ,अहमदनगर येथील प्रांगणामध्ये रॅलीच्या लेझीमचा डाव संपन्न झाला.पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रॅलीचे स्वागत केले . पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी व श्री. सोमवंशी यांनी रॅलीचे स्वागत करून आभार मानले. चौकाचौकात रॅलीचे स्वागत झाले.
🟫🟫🟫🟫🟫🟫
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟥🟥🟥🟥🟥🟥
   प्राचार्या श्रीमती जोशी यांच्या शुभहस्ते रॅलीचा शुभारंभ संपन्न झाला.” अशा सकारात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती बालवयापासूनच समृद्ध करण्याचे सकारात्मक कार्य होत आहे, आपल्या घरावर तिरंगा लावून राष्ट्रीय एकात्मता ही भावना सतत जागृत करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे, रॅलीमुळे विद्यार्थी शिक्षक पालकांच्या मनातील हे अमृत महोत्सवी वर्ष कायमस्वरूपी प्रेरणादायी राहणार आहे .”असे प्रतिपादन श्रीमती जोशी यांनी केले.
🟨🟨🟨🟨🟨🟨
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
http://bit.ly/3Bds6RA
🟩🟩🟩🟩🟩🟩
  “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही या शतकातील सर्वात अनमोल अशी गोष्ट आहे, त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तिरंगी ध्वज लावण्याबरोबरच आपल्या आचरणातून देशभक्ती सतत दिसली पाहिजे यासाठी पुढील काळ महत्त्वाचा आहे .”असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री दुर्योधन कासार यांनी केले.
   रॅलीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही लेझीमचा फेर धरला. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाने स्वयंस्फूर्तीने पालक देखील सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वीतीसाठी चारही विभागाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. समर्थ प्रशालेच्या प्रांगणात रॅलीचा समारोप संपन्न झाला. यावेळी पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
🟩🟩🟩🟩🟩🟩
🟪डॉ. बागुल यांच्या गुगल पॉडकास्ट रेडिओ चॅनलसाठी 👉पॉडकास्ट क्लिक करा👇
https://anchor.fm/amol-bagul
🟧🟧🟧🟧🟧🟧

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %