🟩🟩🟩🟩🟩🟩
*महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2021-22 अहमदनगर, सावेडी येथील माऊली सभागृहात(झोपडी कॅन्टीन शेजारी..तलाठी-माऊली संकुल) सोम दि. 21/2/2022पासून सुरू झाली आहे.*
🟫🟫🟫🟫🟫🟫
*या ठिकाणी अहमदनगर केंद्रावरील स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न होणार आहे… सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी 2022 पासून ते शनिवार दिनांक 5 मार्च 2022 पर्यंत रोज संध्याकाळी 7 वाजता विविध विषयांवरील दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होणार आहे.*
🟧🟧🟧🟧🟧🟧
*या विविध नाटकांमध्ये आपल्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे आजी-माजी विद्यार्थी तसेच काही कलाकार माता-पालक व पिता पालक देखील कलाकार म्हणून झळकणार आहेत. यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या प्रशालेचे विद्यार्थी कलाकार अथवा माता-पिता पालक कलाकार झळकलेले असून उत्तम अभिनयामुळे त्यांना आजपर्यंत शेकडो पारितोषिके देखील प्राप्त झालेली आहेत.*
🟥🟥🟥🟥🟥🟥
*म्हणून ज्या कलाकार विद्यार्थ्यांना व पालकांना अभिनयाची- नाटकाची आवड आहे..त्यांनी आपली आवड व कला जोपासण्यासाठी तसेच आपल्या प्रशालेच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दररोज संध्याकाळी 7 वाजता नाटक पहायला जरूर जावे.*
🟦🟦🟦🟦🟦🟦
*नाटक सादरीकरण,नाटकाशी संबंधित नाट्यलेखन संहिता, दिग्दर्शन, संगीत ,प्रकाश योजना, संवाद फेक, पोशाख-वेशभूषा, अभिनय आदी विषयांवर बारकाईने निरीक्षण करावे आणि स्वतःतील अभिनय व नाट्यकला विकसित करावी.*
⬛⬛⬛⬛⬛⬛
*प्रवेश शुल्क नाममात्र 10 रुपये व 15 रुपये असून कोरोना प्रतिकूलता कालावधीतील सॅनिटायझर व मास्कचा वापर,सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन प्रेक्षकांनी जरुर करावे*
🟪🟪🟪🟪🟪🟪
⬛⬛⬛⬛⬛⬛
अहमदनगर केंद्रावरील ६० व्या राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अहमदनगर केंद्रावरील उद्घाटन प्रसंगी नगर येथील रंगकर्मी नाट्य लेखक, दिग्दर्शक अमित बैचे, समवेत डावीकडून नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सतीश शिंगटे, सावेडी नाट्य परिषदेचे अध्यक्ष क्षितीज झावरे, नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, परीक्षक अरुण शेलार, अनिल पालकर, सुरेश बारसे,समन्वयक सागर मेहेत्रे आणि सहसमन्वयक जालिंदर शिंदे
🟪🟪🟪🟪🟪🟪
#राज्य_नाट्य_स्पर्धेच्या_निमित्ताने_प्रदीर्घ_काळानंतर_गजबजणार_नाट्यगृह…
सोमवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ पासून माऊली सभागृहात वाजणार तिसरी घंटा…
नगर- सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६० व्या मराठी प्रादेशिक राज्य नाटय स्पर्धा महोत्सव २०२१- २२ चे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील माऊली सभागृह,सावेडी येथे दररोज सायंकाळी ७.०० वा स्पर्धेतील नाटके सुरू होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन हे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन आणि शासनाने आखुन दिलेल्या नियमावलीच्या आधारे करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान संपन्न होणाऱ्या यास्पर्धेत दररोज एक नाटक सादर होणार असुन एकूण ११ नाटके या स्पर्धेमध्ये सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री मा. अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने हि स्पर्धा संपन्न होत आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील नाट्य संस्थांनी यास्पर्धेत आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदविला आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून खंडीत झालेली ही स्पर्धा म्हणजे नगरच्या नाट्य रसिकांसाठी एक पर्वणी असणार आहे. यानिमित्ताने शहरासह जिल्ह्यातील सर्व नाट्य रसिकांना आवाहन करण्यात येते कि, नगरकर नाट्य रसिकांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नवोदित व उदयोन्मुख लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ् यांना उत्तेजन व प्रोत्साहन द्यावे.
(राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्यादिवशी सादर होणाऱ्या हाऊसफुल्ल प्रतिष्ठान या संस्थेच्या ATS या नाटकाच्या तालमीदरम्यानचे दृश्य…)