0 0
Read Time:8 Minute, 45 Second

नगरच्या शिक्षकाने दिल्लीला जाऊन विद्यार्थ्यांना दिले अभ्यासक्रमातील ऐतिहासिक वास्तूंचे धडे
🟪🟪🟪🟪🟪🟪
शिक्षकाने ऑनलाईन शिकवले दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारक व पुराना किल्ल्यासह सात ऐतिहासिक ठिकाणाहून
🟩🟩🟩🟩🟩🟩
नगरमध्ये राहून विद्यार्थ्यांना घडले दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन
 🟥🟥🟥🟥🟥🟥
                                इयत्ता सहावी इतिहास व सातवी मराठी विषयांचा समावेश
  🟦🟦🟦🟦🟦🟦
अहमदनगर/ दिल्ली
 🟥🟥🟥🟥🟥🟥
       येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित प्रयोगशील शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी दिल्लीत उपस्थित राहून प्रत्यक्षरीत्या तेथील राष्ट्रीय युद्ध स्मारक(नॅशनल वॉर मेमोरियल) व पुराना किल्ल्यावरून व्हर्च्युअल पद्धतीने नगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला,सावेडी – माध्यमिक विभागाच्या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना इतिहास व मराठी विषयाशी संबंधित ऐतिहासिक वास्तू व स्मारके यांचे प्रत्यक्ष प्रसारण घडवले.भारताचे संविधान भाग-४क मधील नागरिकांची मूलभूत कर्तव्य यातील अनुच्छेद ५१-क मधील मूलभूत कर्तव्ये यांचा आदर्श वस्तुपाठ डॉ. बागूल यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून दिला.यात राष्ट्र प्रतिकांचा आदर, भारतीय संस्कृतीच्या वारशाचे जतन, मानवतावाद , वैज्ञानिक दृष्टीबद्दल सांगितले आहे.
         विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा व प्रशिक्षणांच्या निमित्ताने दिल्लीमध्ये वास्तव्यास असताना बागुल यांनी शिकवण्याचे विषय घटक व त्या घटकांशी संबंधित दिल्लीतील विविध ऐतिहासिक प्रेरणादायी स्थळे व वेळ व ऑनलाइन तसेचऑफलाइन परवानगी नियमांचे नियोजन केले होते.
 🟥🟥🟥🟥🟥🟥
🟦प्रस्तुत कार्यक्रमासंबंधित अधिक माहिती/ फोटो/ व्हिडीओ खालील👇 लिंक क्लिक करा.
  🟩🟩🟩🟩🟩🟩
   इयत्ता सातवी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील थोरांची ओळख डॉ.खानखोजे-(पाठ ६ वा,लेखिका वीणा गवाणकर),अनाम वीरा (पाठ १३ वा कविता,कवी कुसुमाग्रज) , धोंडा(पाठ १९ वा, लेखक डॉ संजय ढोले-दगडांचे नमुने) ,जय जय महाराष्ट्र माझा(पाठ १ ला-कवी राजा बढे ) या विविध पाठांशी संबंधित क्रांतिकारक शहीद सैनिक तसेच सशस्त्र सेना यांचा सन्मान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक,इंडिया गेट, परमवीर चक्र प्राप्त सैनिकांची स्मारके, शस्त्रास्त्रे व बंदूका संग्रहालय, 15 मीटर उंचीचा वीर जवान स्तंभ, अमर चक्र , वीरता चक्र , त्याग चक्र , रक्षक चक्र तसेच विविध युद्धांमध्ये भारताच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या 26 हजारांहून अधिक भारतीय सैनिकांची प्रेरणादायी नावे कोरलेली भव्य वर्तुळाकार वास्तू आदी ठिकाणी बागुल यांनी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने गुगल मीट ,फेसबुक लाईव्ह आदी ऑनलाइन साधनांच्या मदतीने या पाठांचे प्रत्यक्ष शैक्षणिक साधन दाखवले.डॉ पांडुरंग खानखोजे हे गदर क्रांतीचे प्रणेते व मेक्सिको शेतीतले जादूगार होते.
🟪🟪🟪🟪🟪🟪
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी 
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟥🟥🟥🟥🟥🟥
     तसेच इयत्ता सहावी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील इतिहासाची साधने,हडप्पा संस्कृती , जनपदे आणि महाजनपदे, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये,मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये ,मौर्यकालीन भारत तसेच भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील खडक व खडकांचे प्रकार या पा ठांशी जवळपास संबंधित असलेल्या दिल्लीच्या पुराना किल्ल्यामधील ऐतिहासिक अवशेष, पुरातन अवशेषांचे संग्रहालय,खीलाये पोहना मज्जिद, शेर मंडल,वायूचे पुस्तकालय, महाभारत कालीन वस्तूंचे संग्रहालय, खैरुल मंजिल मशीद, तलाकी दरवाजा,दक्षिणी दरवाजा या ठिकाणी प्रत्यक्षरीत्या जाऊन तेथील प्रशासनाच्या परवानगीने या पाठाची संबंधित ई-शैक्षणिक साहित्य ऑनलाईन दर्शवले.
🟧🟧🟧🟧🟧🟧
🟫डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
🟫🟫🟫🟫🟫🟫
    सुमारे प्रत्येकी दीड तासांच्या ऑनलाईन पाठांमध्ये दररोज शाळेतून शिकवणारे शिक्षक आज दिल्लीतून पठाण शी संबंधित विविध वास्तू/ वस्तू तसेच इतिहासाची भौतिक,लिखित शैक्षणिक साधने दाखवत शिकवत आहेत हे पाहून मुले हरखून गेली. विषय घटकांच्या संबंधित पूरक माहिती सचित्र व ऑनलाइन व्हिडीओ पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
       या उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी (माध्य.)अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथ) भास्कर पाटील,मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात, श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,शालेय समिती चेअरमन ॲड.किशोर देशपांडे ,मुख्याध्यापिका,शिक्षक,पालक , विद्यार्थी आदींचे सहकार्य व शुभेच्छा लाभल्या.
🟧🟧🟧🟧🟧🟧 
अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल +91 9595 54 5555 या मोबाईल क्रमांकावर अथवा amolbagul3@gmail.com या जीमेलवर संपर्क साधू शकता.
🟥🟥🟥🟥🟥🟥


🟪🟪🟪🟪🟪🟪
👇प्रसार माध्यमांनी या उपक्रमाची घेतलेली दखल👇
⬛⬛⬛⬛⬛⬛ 
नगरच्या शिक्षकाने दिल्लीला जाऊन विद्यार्थ्यांना दिले अभ्यासक्रमातील ऐतिहासिक वास्तूंचे धडे
    👇👇
🟥🟥🟥🟥🟥🟥
✒️नगरच्या शिक्षकाने दिल्लीला जाऊन विद्यार्थ्यांना दिले अभ्यासक्रमातील ऐतिहासिक वास्तूंचे धडे

✒️घरी राहून विद्यार्थ्यांना घडले दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन

बातम्यांसाठी संपर्क:- mirror19news@gmail.com

〽️〽️〽️〽️〽️〽️〽️〽️
🟩🟩🟩🟩🟩🟩
शहरातील आदर्श शिक्षक अमोल बागूल यांनी दिल्लीला जाऊन विद्यार्थ्यांना दिले अभ्यासक्रमातील ऐतिहासिक वास्तूंचे धडे 👇

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %