Read Time:7 Minute, 32 Second
गुढीपाडवा-रंगपंचमी -२०२३ विशेष
🟥🟧🟥🟨🟪🟩
गुढीपाडवा-शिवजयंती, मराठीदिनी शासकीय कार्यालयांमध्ये डॉ.बागुल यांनी रेखाटली सुगंधी हायटेक “टे-कलर”रांगोळी
🟩⬛🟪🟨🟥
डॉ.बागूल यांच्या रांगोळीतील माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रथमच प्रयोगातील ‘शिवसृष्टी‘ आणि “म” चे छत्रपती संभाजीराजे व महिला आयोग अध्यक्षांसह मान्यवरांनी केले कौतुक
🟥🟨🟪🟩⬛🟦
कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क आय.एस.ओ.सह जागतिक मानांकनासाठी नामांकन सादर
🟫🟧🟥🟨🟪🟩
अहमदनगर–स्वराज्याची थ्रीडी राजमुद्रा,२० बाय २० फुटांचे ‘ म ‘ हे अक्षर,विशेष दिनांची माहिती देणारे क्यु.आर.कोड,टॅब व ब्लूटूथ स्पीकरवर ऐकली-पाहिली जाणारी गौरवगीते-पोवाडे,मुर्त्या -पुतळे,किल्ला व त्यावरील मावळे,भगवे ध्वज,शिवचरित्रावरील पुस्तके,कवितांचे पोस्टर,रांगोळीतून येणारा सुगंध,कागदी फुलांची सजावट,तेवणाऱ्या समया,रंगीत फुग्यांच्या कमानी,उदबत्तीचा घमघमाट अन् दोन रांगोळयांसोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी स्टिकसह रसिकांची धडपड ..हे चित्र होते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पं.नेहरू सभागृहाचे.
🟩शिवजयंती,जागतिक मराठी दिन व महिला आयोग आपल्या दारी उपक्रमासह तीन दिवस अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये तसेच अहमदनगर महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी येथील जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तथा दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित उपक्रमशील शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी स्वतः नावीन्यपूर्ण संशोधनपर संकल्पनेतून सुमारे ७० विविध सुगंधांतून तयार केलेल्या रंगांच्या रांगोळीचा हायटेक “टे-कलर”पॅटर्न रेखाटला.शिवसृष्टी,२० बाय २० फुटांची ‘म’ या अक्षरातील मुख्य थीम बेस्ड स्वागतम रांगोळी,महाराष्ट्राच्या सांस्कृतिक,ऐतिहासिक,आर्थिक,शैक्षणिक,धार्मिक प्रतीकांची सुगंधी रंगांची रेखाटने डॉ.बागुल यांनी रेखाटली.डॉ.बागुल यांनी रेखाटलेल्या सुगंधी हायटेक “टे-कलर” रांगोळी पॅटर्नचे कॉपीराईट,पेटंट,ट्रेडमार्क,आय.एस.ओ.सह जागतिक मानांकनासाठी नामांकने सादर केली आहेत.डॉ.बागुल यांच्या रांगोळीच्या आधीच्याअसुबा पॅटर्न,अॅरोमा रंगनाथ पॅटर्न यांना ही मानांकने प्राप्त झालेली आहेत.
🟦🟪🟫⬛🟨🟧
🟪संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व फोटोसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.
🟩व्हिडिओसाठी👉
🟩🟪🟨🟥🟧🟫
याप्रसंगी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,खासदार सुजय विखे,आमदार संग्राम जगताप,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,महापौर रोहिणी शेंडगे,अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,उपमहापौर गणेश भोसले,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील,उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ,उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर,ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे अधीक्षक संतोष यादव,स्थायी समिती सभापती कुमार वाकळे,सभागृह नेते अशोक बडे , विरोधी पक्षनेते संपत बारस्कर ,महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे,उपसभापती मीना चोपडा आदी मान्यवरांच्या हस्ते या चार रांगोळ्यांचे उद्घाटन संपन्न झाले.
🟥🟪⬛🟫🟩🟦
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी
🟦🟪🟫⬛🟨🟧
टेकलर या वैशिष्ट्यपूर्ण शब्दातील” टेक” म्हणजे तंत्रज्ञान व “कलर “या दोन शब्दांपासून…. टेक-कलर…..टे-क-लर…टेकलर हा संयुक्त शब्द डॉ.बागुल यांनी तयार केला.’म’ या अक्षरापासून महाराज,मातृभूमी ,मराठी,महाराष्ट्र शासन,महिला असे प्रेरणादायी शब्द तयार होत असल्याने डॉ.बागुल यांनी विकसित केलेल्या सुगंधी ॲरोमा रंगनाथ पॅटर्न मध्ये हा भव्य ‘म’ रेखाटण्यात आला.क्यू.आर.कोड स्कॅन केल्यानंतर शिवजयंती व मराठी दिनानिमित्त माहिती,विविध वेबसाईट,यूट्यूब व्हिडिओ,ॲप खुले होतात,माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रांगोळीतील पहिलाच प्रयोग असल्याचे बागुल यांनी नमूद केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग,मुंबई यांच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी ‘ व जन सुनावणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
🟪🟥🟩🟥🟦⬛
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
🟥अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल +91 9595 54 5555 या मो.क्रमांकावर संपर्क साधू शकता.
🟫🟥🟦🟪🟩🟧
अहमदनगर महानगरपालिकागार्डनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथर्याचे भूमिपूजन
🟥🟩🟪🟨🟧🟩शिवजयंती🟥🟩🟪🟨🟧🟩
🟩🟧🟨🟪🟥🟪मराठी दिन🟧🟩🟨🟪🟥🟪
गुढीपाडवा🟦🟧🟪🟨🟥🟩
मराठी दिन🟦🟫⬛🟩🟪🟨🟥🟧
🟪🟥🟨🟩🟨🟥महिला आयोग आपल्या दारी -जनसुनावणी🟧🟥🟨🟪🟩⬛
Happy
0
0 %
Sad
0
0 %
Excited
0
0 %
Sleepy
0
0 %
Angry
0
0 %
Surprise
0
0 %