Read Time:6 Minute, 1 Second
🟥🟦🟪🟫🟩🟧
१९ फेब्रुवारीला,१९ भाषांमधून,१९ वेशभूषांमधून,१९ विद्यार्थ्यांचे,१९ वाक्यांच्या भाषणातून छत्रपती शिवरायांना अभिवादन
🟥🟦🟨🟫🟧🟪
‘च’ची भाषा,कर,न प,ह न च्या वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषांनी जिंकली श्रोत्यांची मने
🟪🟥🟩🟦⬛🟥
शिक्षक डॉ.अमोल बागुल यांचा शिवजयंतीनिमित्त “पंचक-१९” उपक्रम
🟨🟫🟪🟥🟦🟩
अहमदनगर-शिवजयंती सोहळा-२०२३ चे औचित्य साधून येथील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला,सावेडी, माध्यमिक विभागाच्या १९ विद्यार्थ्यांनी १९ फेब्रुवारीला १९ भाषांमधून १९ वेशभूषांमधून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल १९ वाक्यांमधून भाषण,मनोगत,गारद , सुविचार,शायरी ,कथा,रिल्स,पोवाडा,कविता सादर केल्या.दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी हा”पंचक-१९” उपक्रम राबवला.नामशेष होत जाणाऱ्या विविध बोलीभाषा,प्रादेशिक भाषांबरोबरच कौशल्य व वैशिष्ट्यपूर्ण ‘च’ची भाषा,कर ,न प,ह न च्या सांकेतिक भाषांनी श्रोत्यांची मने जिंकली.
🟦🟪🟫⬛🟨🟧
🟥संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व फोटोसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.
https://bagoogle.in/4722-2/
🟩व्हिडिओसाठी👉https://youtu.be/W3S64ifC-iw
🟣हा व्हिडिओ यूट्यूब वर पाहताना मोबाइल उभा धरावा,व फुल स्क्रीन मोड चालू करावा.व्हिडिओच्या खालील कोपऱ्यावरील [ ] हे चिन्ह क्लिक करावे.
🟨🟥🟪🟧🟦🟫
युट्युब चॅनेल वरील “सबस्क्राईब” हा लाल रंगातील शब्द क्लिक करावा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येतील.
🟫⬛🟪🟥🟩🟪
मराठी,हिंदी,इंग्रजी,संस्कृत,गुजराती,बंजारा,मारवाडी,अहिराणी,कैकाडी, ‘च ‘ ची भाषा ,’क’ ची भाषा, ‘कर ‘ ची भाषा , ‘नप’ ची भाषा,’ह’ ची भाषा,’न’ ची भाषा,तेलुगु,कन्नड,कोकणी,दिव्यांगांसाठीची सांकेतिक भाषा इ.भाषांमधून विद्यार्थ्यांनी “पंचक-१९” मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.सांकेतिक भाषा कळाव्यात म्हणून दुभाषी पद्धतीने विद्यार्थ्यांची मदत घेऊन स्वतः व्हिडिओ तयार केले.बाराखडीतील वैशिष्ट्यपूर्ण अक्षरांच्या भाषांनी तर विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याची चूणूक दाखवली.
उपक्रमासाठी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य तथा श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला ,माध्यमिक विभागाचे शालेय समिती चेअरमन अँड. किशोर देशपांडे ,प्राचार्या श्रीमती संगीता जोशी तसेच पर्यवेक्षिका संगीता सोनटक्के व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
🟥🟪⬛🟫🟩🟦
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟦🟪🟫⬛🟨🟧
“छत्रपती शिवरायांनी अठरापगड समाजातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केली.स्वराज्यातून राष्ट्रीय एकात्मता जगाला दाखवून दिली. म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्यात येत आहे. भाषेने जग जोडले जाते. मातृभाषा,मूळ गाव,राज्य तसेच स्थलांतर या माध्यमातून घराघरात बोलल्या जाणाऱ्या ‘घरभाषा’ जगभर फिरत असतात.शाळांमधून असे विद्यार्थी सापडतात.यामुळे पालकांची देखील खूप मोठी मदत झाली.”असे प्रतिपादन डॉ. बागूल यांनी केले.
🟩🟪🟦🟥🟫🟧
पंचक-१९ उपक्रमामध्ये चि.श्लोक चौरे,कु.गार्गी शेळके,कु.नेहा खराटे,कु.श्रावणी भुजबळ,कु.श्रावणी शिदोरे,कु.श्रद्धा फुलपगार,कु.आराध्या तागड,कु.सिद्धी मदने,कु.भारती तागड,कु.मेघा मगर,चि.पार्थ बोरुडे,कु.परिधी नलगे,कु.समृद्धी गांगर्डे,कु.गायत्री देवराव,कु. अंजली जाधव,कु.ज्ञानेश्वरी गाढे,कु.धनश्री काळे,कु.कृष्णाली तागड,कु.मनस्वी काठमोरे, चि.पार्थ जरे,कु.लावण्या पालवे,कु.केतकी वाघमारे,कु.गौरवी उमराणी,कु.ऋतिका भालेराव,कु.पूजा मोरे, कु.भक्ती लोखंडे,चि.अथर्व बुरा,चि.गौरव शिरसाठ आदी वक्तृत्वपटूंनी सहभाग घेतला.
🟪🟥🟩🟦⬛🟫
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
🟥🟪⬛🟫🟩🟦