Read Time:3 Minute, 50 Second
🟣🔵🔴⚫🟤🟢
- डॉ. बागूल यांनी साकारला१,१११ अन्नघटकांचा “पोषकगणेशा “व चित्राहार प्रदर्शन
- 🟣🔵🟢🔴⚫🟤
-
“अन्न देवो भव:” उपक्रमात भारत सरकारच्या अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे प्रमाणपत्र🟣🔵🟢🟡🔴⚫अहमदनगर–🔵🟣🟤⚫🟢🟡गणेशोत्सवानिमित्त तसेच भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय आणि खाद्य व पोषण बोर्डाच्या वतीने आयोजित पाचव्या राष्ट्रीय पोषण मास(१ते३०सप्टें)व सप्ताह(१ते७ सप्टें)निमित्त येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या संतुलित आहारातील सुमारे १,१११ अन्न घटकांचा वापर करून “पोषक गणेशा “या जनजागृतीपर आरास व देखाव्याचीतसेच आहाराचे महत्त्व दर्शवणाऱ्या चित्राहार या प्रदर्शनाची निर्मिती केली आहे.”अन्न देवो भव:” उपक्रमात भारत सरकारच्या अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे प्रमाणपत्र डॉ.बागूल यांना प्राप्त झाले आहे.🔴🟠🟡🟢🔵🟣🟥संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व फोटोसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.https://bagoogle.in/3131-2/🟦व्हिडीओसाठी👉 https://youtu.be/tHutWQczlF4🟤⚫🔴🟢🔵🟣डॉ.बागूल यांनी १४ बाय १२ फुट कागदी रंगीत आरेखानावर कडधान्ये, तृणधान्ये, आयुर्वेदिक-औषधी वनस्पती तसेच जीवनसत्वे, प्रथिने,स्निग्ध पदार्थ,कर्बोदके देणाऱ्या अन्नघटकांची मांडणी पर्यावरण पूरक साहित्याच्या वापरासह केली आहे.बालक,महिला व प्रौढ व वृद्ध माणसे अशा चार गटांमध्ये गणेशचित्रातील पोषक अन्न घटकांची घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तसेच सकाळ,दुपार व रात्रीच्या आहारानुसारदेखील मांडणी केली आहे.शाडूमातीच्या गणेशमूर्ती बरोबरच आहाराचे महत्त्व सांगणारे तक्ते,घोषवाक्ये, भित्ती चित्रे देखील लावण्यात आली आहेत.तसेच पोषक गणेशाच्या आरतीचे काव्यलेखन देखील डॉ. बागुल यांनी केले आहे.आरतीनंतर प्रसाद म्हणून पोषक पदार्थ दिले जातात.🔴🟠🟡🟢🔵🟣🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वे
बिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी 🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.⚫🟤🟣🔵🟢🟡निकस आहार ,कोरोना कालावधी , व्यायामाचा अभाव व फास्ट फुडचे सेवन यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य खालावून दुर्धर रोग वेगाने पसरत आहेत.शरीर बांधणीनुसार योग्य आहार व विहाराची गरज आहे, याकरिता पोषक गणेशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ,असे डॉ. बागूल यांनी सांगितले.🔴🟢🔵🟣🟤⚫🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी⚫🔴🔵🟣🟤🟢