1 0
Read Time:5 Minute, 38 Second

🟥🟥🟥🟥🟥🟥

अमृत 1947 ” माहितीपट प्रेरणादायी-नामदार राधाकृष्ण विखे पाटील

🟨🟨🟨🟨🟨🟨

डॉ.अमोल बागुल यांची अमृत महोत्सवातील उपक्रमांवर आधारित माहितीपट निर्मिती
🟦🟦🟦🟦🟦🟦
अहमदनगर-
         “वैभवशाली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशभरात व जगभरात विविध देशभक्तीपर उपक्रम राबवले गेले या उपक्रमातून भारतीयांची व अन्य परदेशी नागरिकांची भारताबद्दल देशभक्ती व आदर समृद्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे.बागुल यांच्या अमृत 1947 या माहितीपटातून अमृत महोत्सवी वर्षात जगभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आलेला आहे.हा माहितीपट निश्चितच प्रेरणादायी आहे” असे प्रतिपादन नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील ( मंत्री- महसूल ,पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य)यांनी केले.
🟩🟩🟩🟩🟩
🟥संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व फोटोसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.
https://bagoogle.in/3003-2/
🟦व्हिडीओसाठी👉
🟥🟥🟥🟥🟥🟥
           येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतासह विविध देश,संस्था,संघटना,आस्थापना व व्यक्ती यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत “अमृत 1947 “माहितीपटाची निर्मिती, संहिता ,संपादन व दिग्दर्शन केले आहे.येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण सोहळ्यातील या माहितीपटाच्या प्रकाशनाप्रसंगी श्री. विखे बोलत होते.
🟨🟨🟨🟨🟨🟨
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
http://bit.ly/3Bds6RA
🟩🟩🟩🟩🟩🟩
        सुमारे एक तासाच्या या माहितीपटामध्ये मा. राष्ट्रपती महोदया द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणपर शुभेच्छा, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरील ऐतिहासिक भाषण, जमिनीपासून सुमारे 30 किलोमीटर उंचीवर अंतराळात फडकवण्यात आलेला तिरंगा,भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांची जमीन-हवा-पाण्यावरील चित्तथरारक प्रात्यक्षिके,  ऐतिहासिक-धार्मिक-अध्यात्मिक-स्वातंत्र्याची पार्श्वभूमी असलेल्या वास्तूवरील रोषणाई, विश्वविक्रमी तिरंगी ध्वजारोहण, हर घर तिरंगा मोहीम, विश्वविक्रमी मानवी साखळ्यांमधून तयार केलेले विविध देशभक्तीपर आकार,विविध कला महोत्सव कलांची प्रदर्शने,आकर्षक शोभायात्रा व प्रभातफेऱ्या,महोत्सवासंदर्भात जगभरात झालेले विविध जागतिक विश्वविक्रम,राष्ट्रभक्तीपर गीतांचे निर्मिती व वाद्य वादन-गायन आदी आश्चर्यजनक व प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश डॉ. बागुल यांनी केला आहे.
        जगभरातील विविध देशांमधील मित्र,संस्था,संघटना तसेच इंटरनेट,विविध प्रसार माध्यमे व समाजमाध्यमे यावरून बागुल यांनी ही माहिती संकलित करून त्याची सुरेख मांडणी या माहितीपटात केली आहे.युट्युबवर अमृत 1947 या नावाने हा माहितीपट उपलब्ध आहे.
🟪🟪🟪🟪🟪🟪
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी
https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟥🟥🟥🟥🟥🟥
      यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित,श्री अशोक कडूस( शिक्षणाधिकारी -माध्यमिक), श्री भास्कर पाटील (शिक्षणाधिकारी- प्राथमिक), स्थानिक लोकप्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
🟩🟩🟩🟩🟩🟩
🟪डॉ.बागुल यांच्या गुगल पॉडकास्ट रेडिओ चॅनलसाठी 👉पॉडकास्ट क्लिक करा👇https://anchor.fm/amol-bagul
🟧🟧🟧🟧🟧🟧

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %