Read Time:4 Minute, 43 Second
- 🟦🟦🟦🟦🟦🟦
शिक्षकाने मोबाईलवर तयार केला नगरी स्वातंत्र्य चळवळीचा माहितीपट
⬛⬛⬛⬛⬛⬛
‘द फ्रीडम सिटी- अहमदनगर ‘ माहितीपटाने विद्यार्थ्यांच्या देशभक्तीला समृद्ध केले -श्रीमती जोशी
🟧🟧🟧🟧🟧🟧
अहमदनगर-
🟨🟨🟨🟨🟨🟨
“भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध देशभक्तीपर उपक्रमांनी देशभरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे.”अहमदनगर -द फ्रीडम सिटी “माहितीपटाने श्री समर्थ प्रशालेच्या विद्यार्थ्यांची मने जिंकली आहेत.आपल्या शहराविषयी व जिल्ह्याविषयी आपल्याला सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. यातून मातृभूमीबद्दल आस्था वाढीस लागते.अहमदनगर व भारतीय स्वातंत्र्याचा महत्त्वाचा संबंध आहे. या माहितीपटामुळे विद्यार्थ्यांच्या देशभक्तीला निश्चितच समृद्ध केले आहे, “असे प्रतिपादन प्राचार्य श्रीमती संगीता जोशी यांनी केले.
सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, माध्यमिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित प्रयोगशील शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी फक्त मोबाईलचा वापर करून निर्मिती व दिग्दर्शन व संहिता लेखन केलेल्या “अहमदनगर – द फ्रीडम सिटी ” या माहितीपटाच्या सादरीकरण उद्घाटनाप्रसंगी श्रीमती जोशी बोलत होत्या.
🟫🟫🟫🟫🟫
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशालेमध्ये १ ते १७ ऑगस्ट२०२२ या कालावधीत देशभक्तीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.समर्थ सभागृहामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे१७०० विद्यार्थ्यांना दिवसभर प्रोजेक्टरद्वारे भव्य पडदयावर या माहितीपटाच्या सादरीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.सिनेमाचा पडदा व उपक्रमाच्या फलकाला केलेली तिरंगी फुग्यांची सजावट तसेच देशभक्तीपर घोषणा-गीते आणि टाळ्यांच्या कडकडाटाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. सुमारे२५ मिनिटांच्या माहितीपटामध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अहमदनगर, येथील प्रेरणादायी शिवकाळ,भुईकोट किल्ला व ऐतिहासिक वास्तू, त्यक्ती, प्रसंग व घटना तसेच अहमदनगर:काल-आज -उद्या या संकल्पनांची सुरेख गुंफण या माहितीपटामध्ये आहे.श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य तथा प्रशालेचे शालेय समिती चेअरमन अॅड.किशोर देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य उपक्रमासाठी लाभले.
🟫🟫🟫🟫🟫🟫
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी
🛑https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟥🟥🟥🟥🟥🟥
स्वागत शिक्षक वसंत गायकवाड यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका संगिता सोनटक्के यांनी मानले.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सातपुते,कानडे,राशिनकर,पथवे,शिंदे तसेच सौ.कांबळे, सौ.अंबाडे,.सौ. बोठे,सौ.अकोलकर ,सौ.नारळे ,सौ.शास्त्री, श्रीम.कासार,श्रीम स्व.कुलकर्णी,श्रीम.गोरे,सौ.कोहकडे ,सौ.कुताळ ,सौ.वाघमारे ,सौ.कुलकर्णी,कु.दारकुंडे, कु.भोंदे,सौ.कातोरे,सौ.पाटील आदींनी परिश्रम घेतले.
🟪🟪🟪🟪🟪🟪
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी👉
http://bit.ly/3Bds6RA
🟩🟩🟩🟩🟩🟩