0 0
Read Time:5 Minute, 28 Second

वाय फॉर योगा’-आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन
🟥🟥🟥🟥🟥🟥
शिक्षक डॉ.अमोल बागुल यांचा उपक्रम
🟩🟩🟩🟩🟩🟩
योगा तो होगा”-योग करतानाचे फोटो पाठविण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे योगसाधकांना आवाहन.
🟦🟦🟦🟦🟦🟦
अहमदनगर-
🟫🟫🟫🟫🟫🟫
          सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालय,भारत सरकार व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या वतीने सुमारे 30 देशांतील भारतीय तथा विदेशी योगसाधक यांच्या योगज्ञान आदान- प्रदानाच्या “वाय फॉर योगा” या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन योग परिषद 2021 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तथा परिषद आयोजक डॉ.अमोल बागुल यांनी दिली आहे.
🟥🟥🟥🟥🟥🟥
          19 जून ते 30 जून 2021 या कालावधीमध्ये कोरोना प्रतिकुलतेमुळे विविध समाज माध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या व “योगा तो होगा” या शिर्षकाने संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योगा परिषदेमध्ये अनंत बिरादार(भारत)प्रमुख अतिथी,देवा शेरमाळे(चीन),ॲनिली(अमेरिका),एलिजाबेथ(चीन),डॉ.वैष्णवी पतकी(अमेरिका),शिवानी जाधव(कॅनडा),गणेश्वरी व्यास (कॅनडा),मनोज जोशी (अमेरिका),अमोल सावरकर(स्वित्झर्लंड),रचना फासाटे(आफ्रिका),प्रीती जोशी(अमेरिका),वंदना शरमाळे(यूएई),अपूर्वा सासवडकर(डब्लिन),समृद्ध जोंधळे(आयर्लंड),आकाश कुरी(सिंगापूर),सुनील जाधव(मकाउ),राहुल औताडे(थायलंड),वसुधा जाधव (कॅनडा),दीप्ती शिंदे(फ्लोरिडा),सुजाता पटवर्धन- (ऑस्ट्रेलिया),रवींद्र पिंगळे (लंडन),मेघा नायर (न्युझीलंड)आदी मान्यवर सहभागी होणार असून डॉ.बागुल यांनी 30 देशातील योगसाधकांचा शोध घेवून संपर्क साधला आहे. या परिषदेत समन्वयक व मुलाखतकार म्हणून डॉ. बागूल काम पाहणार आहेत.
🟦🟦🟦🟦🟦🟦
      आंतरराष्ट्रीय योग परिषदेतीलच “योगा तो होगा” या उपक्रमाअंतर्गत सहभागी होणाऱ्या योगसाधकांनी स्वतः योग करत असलेला फोटो व स्वतःचे संपूर्ण नाव  7058 314 555 या व्हाट्सअप क्रमांकावर अथवा https://wa.me/+917058314555  या व्हाट्सअप क्रमांकाच्या लिंकवर 30 जून 2021 पर्यंत पाठवावेत.सहभागी होणाऱ्या योगसाधकांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.यासाठी INO उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा प्रेरणा नाबरिया प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत
🟨🟨🟨🟨🟨🟨
      भारतातून जगभरात पोहोचलेली योगसाधना,योगाचे परदेशातील वातावरण आणि प्रचार-प्रसार,योग साधकांचे अनुभव,विविध प्रकल्प,आंतरराष्ट्रीय योग केंद्रे,जगभरात काम करत असलेले भारतीय योग साधक आणि त्यांचे कार्य या विषयावर “वाय फॉर योगा” या आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चासत्रे व परिसंवाद संपन्न होणार असून सोशल मीडियाच्या विविध ॲपवर दररोज संध्याकाळी 6 वाजता या ऑनलाईन मुलाखतींचे प्रसारण केले जाणार आहे.
🟩🟩🟩🟩🟩🟩
        सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे “घरीच सुरक्षित रहा व घरातच योग करा” हे घोषवाक्य असून आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या यशस्वीतेसाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन अहमदनगर शाखेचे अध्यक्ष डॉ.यशवंत पाटील,सुभाष जाधव, सुरेश सावंत, श्रीनिवास नाबरिया,आसाराम विलायते, ज्योती सैंदाणे, भरत बागरेचा,प्रमिला अगरवाल, अचला  झंवर, ज्योती कानडे, शारदा देशपांडे, अमर अगरवाल ,श्रीरंग राहिंज ,अशोक गहल,वंदना शेरमाळे, करुणा गवले,अमृता नळकांडे,राजश्री पिंगळे,दिनकर नेमाने,विदया मुळे, सुनिता डागा आदी प्रयत्नशील आहेत.
⬛⬛⬛⬛⬛⬛
        डॉ.बागूल योगशिक्षक,योग स्वयंसेवक म्हणून कार्यरत असून योगविषयक अनेक जागतिक उपक्रमांत तथा विश्वविक्रमात त्यांचा सहभाग आहे.
🟥🟥🟥🟥🟥🟥

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %