0 0
Read Time:5 Minute, 21 Second

🟦🟦🟦🟦🟦🟦

मातोश्री स्व.शशिकला सुरेश बोज्जा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  “आईच्या कवितांचा जागर”

🟥🟥🟥🟥🟥🟥

“आई मायेचा सागर ” माहितीपटाची निर्मिती व प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे श्रीनिवास बोज्जा यांचे आवाहन
🟩🟩🟩🟩🟩🟩
 अहमदनगर
🟪🟪🟪🟪🟪🟪
      सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांच्या मातोश्री स्व. शशिकला बोज्जा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  “आईच्या कवितांचा जागर” या आईविषयक भावभावनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साहित्यिक उपक्रमाचे शनिवार दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता (सावेडी) अहमदनगर येथील गुलमोहर रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती मा . नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांनी दिली आहे.त्याचबरोबर “आई मायेचा सागर” या प्रेरणादायी माहितीपटाचे  प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
🟨🟨🟨🟨🟨🟨
       कवी संमेलनामध्ये कवी डॉ.अमोल बागुल, कवी डॉ.सूर्यकांत वरकड( व्याख्याते व पत्रकार),वसंत डंबाळे (लोकशाहीर, प्रबोधनकार),कवी अनंत कराड(शिरूर कासार),कवी दशरथ शिंदे,लोकगायक जितेंद्र भारस्कर(शेवगांव) आदी कवी सहभागी होणार आहेत.
🟩🟩🟩🟩🟩🟩
   कार्यक्रमाचे उद्घाटन व माहितीपटाचे प्रकाशन संग्रामभैय्या जगताप (आमदार),रोहिणीताई शेंडगे ( महापौर), गणेश भोसले (उपमहापौर ),संभाजीराजे कदम(शिवसेना शहर प्रमुख), भैय्या गंधे (भाजप शहराध्यक्ष),अभय आगरकर (अध्यक्ष ,विशाल गणेश मंदिर ),मनोज दूलम (नगरसेवक ,मनपा),भगवान फुलसौंदर (माजी महापौर ),बाबासाहेब वाकळे (माजी महापौर) आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
⬛⬛⬛⬛⬛⬛
       स्वर्गीय शशिकला सुरेश बोज्जा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. पद्मशाली समाजातील एक कर्तृत्ववान महिला म्हणून त्या समाजामध्ये परिचित होत्या.घर , कुटुंब व समाजासाठी काम करत असताना हालअपेष्टा सहन करून बोज्जा परिवाराच्या पिढ्या घडवल्या. त्यांच्या कार्याचा गौरव पद्मशाली समाजाने ” पद्मकन्या पुरस्कार ” देऊन केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना “आदर्श माता पुरस्कार” देखील प्रदान करण्यात आला होता.
         त्यांच्यामागे चार मुले , एक मुलगी , सुना , जावई व नातवंडे असा मोठा परिवार असून नातेवाईकांत “बाई” नावाने त्या प्रिय होत्या . कष्टकरी बिडी कामगार म्हणून अत्यंत कष्टातून व श्रमातून त्यांनी स्वतःच्या मुलांना उच्चपदस्थ शिक्षण दिले.समाजातील पंच कारभारी श्री . सुरेश बोज्जा यांच्या त्या पत्नी होत्या . त्यांचा एक मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे तर सामाजिक कार्यकर्ते व फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांच्या त्या मातोश्री असून अहमदनगर महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका सौ. वीणा श्रीनिवास बोज्जा यांच्या त्या सासूबाई होत्या.
      मनमिळावू , धार्मिक व कष्टाळू स्वभाव असल्याबरोबरच परम पूज्य माताजी श्री निर्मला देवीजी यांच्या त्या अनुयायी होत्या . त्यामुळे मंत्रोपचारांमध्ये अग्नी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते .
🟫🟫🟫🟫🟫🟫
      तरी या कविसंमेलनात जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीनिवास बोज्जा,विजय बोज्जा , मनोज बोज्जा , संतोष बोज्जा व अनिता मुत्त्याल तसेच समस्त बोज्जा परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी श्रीनिवास बोज्जा  (9890 81 2000)यांच्याशी या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.
🟥🟥🟥🟥🟥🟥


Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %