0 0
Read Time:8 Minute, 6 Second

 👉मतदारदूत डॉ.अमोल बागूल यांची बारा वर्ष विनामूल्य..पण.. स्वखर्चातून मतदार जनजागृतीची तपसाधना

👉मतदारदूत डॉ. अमोल बागूल यांच्या संकल्पनांचा देशभरात वापर
 
👉25 जानेवारी 2022 राष्ट्रीय मतदार दिन विशेष
 
अहमदनगर-
 
       आज 25 जानेवारी 2022 रोजी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये 12 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे.परंतु पहिल्या राष्ट्रीय मतदार दिनापासून नगर जिल्ह्यामध्ये  मध्ये सलग 12 वर्षे मतदार जनजागृतीचे काम विनामूल्य करणारा अवलिया म्हणजेच दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल होय. त्यांच्या अनेक संकल्पना भारत निवडणूक आयोग , राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र यांनी देशभरात उपयोगात आणल्या.
       सखी मतदान केंद्राची रात्रभर जागून केलेली सजावट असो किंवा मतदार दिनाची अनोखी रांगोळी असो,गळ्यात ढोल ताशा अडकवून मतदार जनजागृतीची केलेली बतावणी असो किंवा चौकात-रस्त्यांवर सादर केलेली पथनाट्य असो , कुणाचीही वाट न पाहता मतदार जनजागृतीची साधने खांद्यावर डोक्यावर वाहणे असो किंवा चौकातल्या ट्राफिक सिग्नलवर मतदार जनजागृतीचा फलक धरून उभे राहणे असो अशा अनेक उस्फुर्त उपक्रमात ड़ॉ.बागुल यांनी सतत पुढाकार घेतला.
 
🟥 विविध दैनंदिन जागतिक उपक्रम सेमिनार वेबिनार स्पर्धा यासाठी☝️ही वेबसाईट देखील बघा.
 
     स्वतःची दिवाळी, उन्हाळी वा नाताळ सुट्टी असो अथवा सुट्टीचा रविवार असो त्या दिवशी देखील मतदार जनजागृतीचे काम अपडेट ठेवणे बागुल यांनी साधले आहे.
 
माहिती तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळानुरूप हायटेक बनत स्वतःला अपडेट ठेवत मतदार जनजागृतीमध्ये देखील त्यांनी अनेक प्रयोग केले. ॲप , वेबसाईट , ब्लॉग , फेसबुक पेजेस , ट्विटर हँडल , इंस्टाग्राम  आदी समाज माध्यमांवर त्यांनी मतदार जनजागृती हलती ठेवली.शरीर विक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी ,बेघर यांच्याशी संवाद ठेवून विविध संस्थांच्या मदतीने त्यांना मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न केले.सूत्रसंचालन , रांगोळी , मेहंदी , हस्ताक्षर , घोषवाक्य , कथा-कविता , काव्यवाचन , वक्तृत्व , भाषण , मुलाखत , फलकलेखन , पथनाट्य , एकपात्री अभिनयआदी विविध कलांचा वापर डॉ. बागुल यांनी मतदार जनजागृती च्या असंख्य उपक्रमांसाठी केला
 
⬛नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी☝️हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.
 
श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी माध्यमिक विभाग येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. बागूल प्रसिद्धी,लोकप्रियता आणि व्यक्तीमत्वाबरोबर असलेल्या विशिष्ट वलयाचा मतदार जनजागृतीसाठी कसा वापर करता येईल याचे अनोखे उदाहरण  आहेत .
 
       डॉ.बागुल यांच्या मतदानासाठी विद्यार्थ्यांनी भरावयाचे संकल्पपत्र, मी लोकशाही बोलतेय,विधानसभेचा सिग्नल, मेरे देश की सेल्फी, एक पत्र लोकशाहीला, 21 मिनिटांचा व्हिडिओ निर्मिती स्पर्धा, लोकशाहीचा उत्सव स्पर्धा, टॉक टू कलेक्टर, माझी सही माझे मत साक्षरता अभियान आदी  संकल्पना भारत निवडणूक आयोगाने देशभरात उपयोगात आणल्या. यातील संकल्पपत्र संकल्पनेचे व सर्वात जास्त स्वीप उपक्रम राबवण्याचे जागतिक विक्रम झाले आहेत.रॅली फोर वोट,सखी मतदान केंद्राची सजावट आदी उपक्रम विशेष गाजले. पावसाळ्यातील छत्री, दिवाळीचा आकाश कंदील, दसऱ्याची आपट्याची पाने ,हातावरील मेहंदी किंवा मानवी साखळी मधील किंवा वाढदिवसाच्या केकमधील मतदार जनजागृती संदेश देणाऱ्या कलाकृती व संकल्पना विशेष गाजल्या. यशदा रेडिओ प्रशिक्षणातील सहभाग,सुमारे बारा वर्षांपासून राष्ट्रीय मतदार दिनातील सक्रिय सहभाग,नगर स्वीप फोरम या सोशल मीडियावरील विविध अकाउंटवरील हजारो पोस्टच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान डॉ.बागुल यांनी विशेष करून राबवले.भारत निवडणूक आयोग ,राज्य निवडणूक आयोग ,मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र तसेच जिल्हा निवडणूक शाखा ,अहमदनगर यांच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठका,अहवाल तसेच उपक्रम यामध्ये सातत्याने नवनवीन संकल्पनांसह सक्रिय सहभाग घेऊन समन्वय साधण्याचे काम सातत्याने केले.
 
🟫बागुगल वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी

 

🟥🟥🟥🟥🟥🟥
 
       ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद,महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच लोकसभा-विधानसभा पदवीधर मतदार संघ, तसेच विविध संस्थांच्या निवडणुका आदी निवडणुकांमध्ये मतदार अधिकारी वा तत्सम कामे करतानाच मतदार नाव नोंदणी, मतदार जनजागृती मतदानासाठी प्रोत्साहन, मतदानाची टक्केवारी वाढवणे, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनविषयक जनजागृती, विविध स्पर्धांचे आयोजन व सहभाग, सोशल मीडियाचा चपखल वापर आदी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

 

 

     जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील,जिल्हा निवडणूक शाखा , जिल्हा परिषद शिक्षण विभाग ,  अहमदनगर महानगरपालिका तसेच श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन डॉ.बागूल यांना लाभले

 

 

 
अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल +91 9595 54 5555 यांच्याशी या मो. क्रमांकावर अथवा amolbagul3@gmail.com या जीमेलवर संपर्क साधू शकता.
🟦🟦🟦🟦🟦🟦

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %