🪁🪁मकर संक्रांती विशेष🪁🪁
🟥🟥🟥🟥🟥🟥
🪁पतंगाच्या मांजापासून रक्षण करणार संशोधक शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी बनवलेला “लाइफ रॉड” आणि “कॉलर जॅकेट “🪁
🟪🟪🟪🟪🟪🟪
🪁जगभरातील दुचाकी निर्मिती कंपन्यांना मोफत देणार संशोधनाचे पेटंट,कॉपीराइट, ट्रेडमार्क व आय.एस.ओ.अधिकार🪁
🟦🟦🟦🟦🟦🟦
दोन्ही संशोधनांच्या प्रात्यक्षिकासाठी डॉ.बागुल यांनी शोधली गंमतीदार 😂”टेस्टी पताका”😂 पद्धत
🟥🟥🟥🟥🟥🟥
🪁अहमदनगर🪁
🟩🟩🟩🟩🟩🟩
🪁नायलॉन व जीवघेण्या चिनी मांजापासून दुचाकीस्वारांना पतंगांच्या दिवसात संरक्षण मिळावे त्याचबरोबर रस्तालुटीच्या प्रकरणात काही ठिकाणी आडव्या तारा बांधल्या जातात यापासूनदेखील संरक्षण मिळावे म्हणून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित संशोधक शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी दुचाकीच्या हँडलला लावण्यासाठी ” लाइफ रॉड ” व दुचाकीस्वाराच्या गळ्याला लावण्यासाठी ” कॉलर जॅकेट ” तयार केले असून यामुळे अनेक अपघात टळून जीवितहानी होणार नाही तसेच या दोन्ही संकल्पनांच्या निर्मितीचे पेटंट ,ट्रेडमार्क, कॉपीराइट तसेच आय.एस.ओ. प्रमाणीकरण व अधिकार जगभरातील दुचाकी निर्मिती कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत देण्याचे डॉ. बागुल यांनी जाहीर केले आहे. 🪁
🟨🟨🟨🟨🟨🟨
🟩डॉ.बागूल यांच्या दोन्ही संशोधनांच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ आपण येथे👇 पाहू शकता
🟥🟥🟥🟥🟥🟥
🪁२०० ग्रॅम वजनाचा लाईफ रॉड हा साधारणत: दीड ते दोन फुटांचा धातूचा पोकळ पाईप असून यावर रात्री चमकणारे रेडियम डकवण्यात आले आहे .त्यावर मांजा अडकुन तूटण्यासाठी अणकुचीदार खाचा देखील तयार करण्यात आल्या आहेत.रॉड वॉटरप्रुफ असून दुचाकीस्वाराचा डाव्या बाजूच्या आरशाच्या नटबोल्टमध्ये हा रॉड काही सेकंदांमध्ये सहजपणे बसवता येतो व काढताही येतो. यासाठी अंदाजे खर्च १३० रुपये येतो.🪁
🟧🟧🟧🟧🟧🟧
🪁कॉलर जॅकेटमध्ये हाय डेन्सिटी पॉलिप्रॉपीलीन या प्लास्टिकसदृश्य पण मजबूत पदार्थ तसेच हीटलॉनचा वापर करण्यात आला असून घातक मांजाने ते कापले जात नाही. यास छातीकडील व चेहऱ्याच्या हनुवटीकडील भागास सपोर्टर लावण्यात आलेले आहेत.हेल्मेट घातल्यानंतर गळ्याचा जो भाग उरतो तेवढ्या भागावर हे कॉलर जॅकेट लावता येईल.यावर देखील मांजा अडकून तुटण्यासाठी खाचा करण्यात आलेल्या आहेत.त्याचे वजन ७० ग्रॅम असून वॉटरप्रूफ आहे.अंदाजे खर्च ३० रुपये येतो.🪁
🟦🟦🟦🟦🟦🟦
🪁डॉ. बागूल यांच्या या दोन संशोधनांच्या संकल्पनांनुसार उद्योजक निलेश पठारे ,उद्योजक सुनील मोरे व उद्योजक जिम्मी वधवा यांनी डॉ. बागुल यांना वस्तू संशोधन निर्मितीत महत्त्वाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.🪁
🟥🟥🟥🟥🟥🟥
प्रात्यक्षिकासाठी डॉ. बागुल यांनी “टेस्टी पताका” ही पद्धत शोधून काढली. दुचाकीस्वार गाडीवरून जाताना लाइफ रॉड मुळे मांजा तुटतो हे प्रात्यक्षिक लांबून मांजा डोळ्याला दिसत नसल्यास कसे दाखवता येईल असा प्रश्न पडल्यावर मांजाला रद्दी कागद पताकांप्रमाणे लावून त्यादिशेने दुचाकीस्वाराने गाडी चालवून लाइफ रॉडच्या ब्लेडला लागून मांजा तुटतो हे व्हिडिओमध्ये दिसते/दाखवता येते. “टेस्ट” करण्यासाठी या मांज्याला लावलेल्या “पताका” वापरल्या म्हणून डॉ. बागुल यांनी या पद्धतीला “टेस्टी पताका” असे गंमतीदार नाव दिले.
🟩🟩🟩🟩🟩🟩
🪁भारतातील हिरो, होंडा , सुझुकी,बजाज , ओला , यामाहा , जावा , केजीएफ , केटीएम , टीव्हीएस , महिंद्रा , रॉयल इन्फिल्ड , अथर एनेर्जी यासारख्या मातब्बर दुचाकी कंपन्यांबरोबरच सुमारे 33 देशांतील 150 प्रकारच्या दुचाकी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना बागुल यांनी हे संशोधन ऑनलाइन पाठवले असून नवीन दुचाकी विकत घेतानाच ग्राहकाला इतर ॲक्सेसरीजबरोबर दुचाकीबरोबर हा लाइफ रॉड आग्रहाने देण्यात यावा व पतंग महोत्सवानुसार ग्राहकांनी वापरावा,असे आवाहनही त्यांनी सदर कंपन्यांना केले आहे. नायलॉन व चिनी मांजा वापरण्यास प्रतिबंध विषयक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच समाजामध्ये लोकजागृती होण्याकरिता ऑनलाईन सेमिनार,वेबीनार देखील डॉ.बागुलआयोजित करणार आहेत.🪁
⬛⬛⬛⬛⬛⬛
🪁भारतातील तसेच जगभरातील दुचाकी निर्मिती रचना व डिझाईन करणाऱ्या “कोड ऑफ व्हेईकल डिझाईन” (वाहन रचना आरेखन संहिता अधिनियम) आस्थापने यांना देखील नवीन दुचाकी रचना आरेखन करताना या रॉडचा आग्रहाने समावेश करावा असे आवाहन डॉ. बागूल यांनी केले आहे.तसेच नितिन गडकरी(केंद्रीय रस्ते ,वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री) ,ॲड अनिल परब(परिवहन व संसदीय कार्यमंत्री) तसेच सतीश पाटील( राज्यमंत्री गृह , शहरे , गृहनिर्माण , परिवहन , माहिती-तंत्रज्ञान , संसदीय कार्य , माजी सैनिक कल्याण),रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,आर टी ओ-मोटार वाहन विभाग -महाराष्ट्र,आदी ठिकाणी देखील हे संशोधन ऑनलाइन पाठवले आहे.🪁
🟥🟥🟥🟥🟥🟥
🪁डॉ. बागुल संशोधित कॉलर जॅकेट ज्यांना हवे असल्यास त्यांनी उद्योजक तथा मॅन्युफॅक्चर श्री. निलेश पठारे,स्मार्ट ड्रेपरी,सार्थक,183,लक्ष्मीनगर,तपोवन रोड,विठ्ठलरुक्मिणी मंदिराजवळ,सावेडी,अहमदनगर, मो.नं. 83292 10855 या क्रमांकावर संपर्क साधावा.🪁
🟪🟪🟪🟪🟪🟪
अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल +91 9595 54 5555 या मो.क्रमांकावर व amolbagul3@gmail.com किंवा https://bagoogle.in/ वर संपर्क साधू शकता
🟥🟥🟥🟥🟥🟥
🟩डॉ.अमोल बागुल संशोधित लाइफ रोड व कॉलर जॅकेट या संशोधनांची वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल
🟪सह्याद्री दूरदर्शन चैनल
🟪महानगर न्यूज चॅनल
🟪जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल
🟪आवाज महाराष्ट्राचा न्यूज पोर्टल
सकारात्मक बातमी –
नायलॉन मांजा तसेच रस्त्यावर आडव्या तारा लावून लुटण्याच्या प्रकरापासून बचाव करण्यासाठी नगरच्या ‘या’ अवलिया डॉक्टरने बनवले लाईफ रॉड आणि कॉलर जॅकेट..*
वाचा सविस्तर👇🏽
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
https://awajmaharashtracha.news/नायलॉन-मांजा-तसेच-रस्त्य/
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आवाज महाराष्ट्राचा
9225314327
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
🟪न्यूज9 महाराष्ट्र
पतंगाच्या मांजापासून संरक्षण
▪️डॉ.अमोल बागुल यांनी बनवलेला “लाइफ रॉड” आणि “कॉलर जॅकेट चर्चेत “
▪️जगभरातील दुचाकी निर्मिती कंपन्यांना मोफत देणार संशोधनाचे पेटंट,कॉपीराइट, ट्रेडमार्क व आय.एस.ओ.अधिकार..
http://www.news9maharashtra.in/2022/01/blog-post_73.html
🟪maharashtra times
शिक्षकाची कमाल! मांजापासून बचावासाठी बनविले ‘हे’ भन्नाट साधन
http://mtonline.in/qUwpGa?baa via @mataonline: http://app.mtmobile.in
🟪 लोकशाही न्यूज चॅनल
Ahamganagar | पतंगाच्या मांजापासून होणार रक्षण; डॉ.अमोल बागुल यांनी बनवलं कॉलर जॅकेट
🟪 पब्लिक न्यूज ॲप
🟪मेट्रो न्युज अहमदनगर
पतंगाच्या मांजापासुनरक्षण करणार संशोधक डॉ अमोल बागुल यांनी बनवलेला “लाईफ राँड” आणि “काँलर जँकेट”
🟪 दैनिक सामना
🟪दैनिक नवा मराठा
https://enavamaratha.com/227388
🟪 दैनिक सामना