5 0
Read Time:8 Minute, 18 Second


https://bagoogle.in/

🟪🟪🟪🟪🟪🟪

डॉ.बागूल यांच्या “बागुगल वेबसाईट” चे डॉ.बागले यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

🟥🟥🟥🟥🟥🟥

जागतिक उपक्रमांच्या खजिन्यासाठी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन

🟪🟪🟪🟪🟪🟪

माझ्यासारखी इतरांना देखील पारितोषिके मिळावीत- डॉ.बागुल

🟦🟦🟦🟦🟦🟦

दररोजच्या विविध जागतिक उपक्रमांसाठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.खालील पैकी कुठल्यातरी एकाच ग्रुपला सहभागी व्हावे सर्व ग्रुपला सारख्याच पोस्ट येणार आहेत.

एखादा ग्रुप फुल झाला असल्यास त्याच्या पुढच्या ग्रुप ट्राय करावा.

327

328

329

330

331

332

333

334

335

336

337
512

513

514

515
516

517

518

519
1112

1113
1114
1115
1116
1117
1118
1119
1120
1121
1122
1123
1124
1125
1126
1127
1128
1129
1130
1131





अहमदनगर-

🟥🟥🟥🟥🟥🟥

कोरोना प्रतिकूलता कालावधीत संपूर्ण जग ऑनलाइन झालेले असताना बागुगल या वेबसाईटच्या माध्यमातून शिक्षक, पालक,विद्यार्थी व कलाकार यांना जगभरातील स्पर्धा, प्रशिक्षण,उपक्रम ,सेमिनार,वेबीनार एकाच व्यासपीठावर आणण्याचा डॉ.बागुल यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.जगभरातील विविध आधुनिक शैक्षणिक व सांस्कृतिक घटक यांचे यांचे आदानप्रदान या वेबसाईटच्या माध्यमातून होण्यासाठी मदत होणार आहे असे प्रतिपादन डॉ.सुभाष बागले यांनी केले.

🟫🟫🟫🟫🟫🟫

    येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांच्या “बागुगल” या शैक्षणिक वेबसाईट तथा न्यूज पोर्टलचे उद्घाटन डॉ. सुभाष बागले यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

🟩🟩🟩🟩🟩🟩

आय.सी.टी.तंत्रज्ञ केदार भोपे,वेब डेव्हलपर रवी राऊत व सर्वाधिक कमी वयाचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विराज म्याना याने या वेबसाइटसाठी परिश्रम घेतले.

🟧🟧🟧🟧🟧🟧

 बागुल आणि गुगल या दोन शब्दातील  साधर्म्य लक्षात घेता बागूल यांनी या वेबसाईटला “बागूगल” शैक्षणिक न्यूज पोर्टल असे नाव दिले.अनेक अडचणींनंतर गुगलने यास मान्यता दिली.

🟪🟪🟪🟪🟪🟪

डॉ.बागुल यांच्या वडिलांचे नाव श्री.सुभाष बागूल असे असून डॉ.सुभाष बागले केडगाव,अहमदनगर येथे वैद्यकीय व्यवसायिक म्हणून आणि अनेक क्षेत्रांमध्ये सुपरिचित तसेच डॉ.बागुल यांचे मार्गदर्शक आहेत.वडील व मार्गदर्शक यांच्या नावातील साधर्म्य देखील डॉ.बागुल यांनी साधले. याप्रसंगी डॉ. स्नेहल भागले व डॉ.श्रेयस बागले आदी उपस्थित होते.

🟥🟥🟥🟥🟥🟥

https://bagoogle.in/

ही वेबसाइटची लिंक असून इतर सोशल मीडियावर दैनंदिन अपडेट्स पाठवली जाणार आहेत.

🟪🟪🟪🟪🟪🟪

“घरबसल्या जागतिक स्पर्धा-उपक्रमांची माहिती मिळणार असल्याने विविध क्षेत्रातील कलाकारांना पारितोषिकांचे माध्यमातून चांगले यश मिळवता येणार आहे. लॉकडाऊन जरी असले तरी “शो मस्ट गो ऑन” म्हणून आपण पुढे चालत राहिले पाहिजे.जगभरातील शिक्षकांचा सहभाग असल्याने यातून निश्चितच वेगळे सकारात्मक शैक्षणिक परिवर्तन घडणार आहे,मला जशी हजारो पारितोषिके मिळाली तशी इतरांना देखील मिळावीत ही या वेबसाइट मागील भावना आहे “असे प्रतिपादन डॉ. बागूल यांनी केले.

⬛⬛⬛⬛⬛⬛

    लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन उपक्रमांना महत्त्व आले असून डॉ.बागुल यांच्या वर्ल्ड टीचर फोरम मधील सुमारे 156 देशातील शिक्षक व संस्था यांच्या माध्यमातून या वेबसाईटवर माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी अनेक जागतिक शिक्षक संघटना संस्था विद्यापीठ यांच्याशी बागुल यांनी संपर्क साधला आहे.

🟨🟨🟨🟨🟨🟨

 जगभरातून या माहितीचे संकलन केले जाणार आहेत.संगणक,विज्ञान तंत्रज्ञान,मनोरंजन,कला-संस्कृती,ताज्या घडामोडी,आरोग्य,जीवनशैली,विविध उपक्रम,क्रीडा,उद्योग,अर्थ,व्यवसाय आदी विविध प्रकारांमध्ये ही निवेदने या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.जगभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष उपक्रम वेबसाईट मधील “टीचर न्यूूूूज रूम” विशेष टॅबमध्ये प्रसिद्ध केले जाणार आहेत.यासाठी शिक्षक-पालक-विद्यार्थ्यांनी आपले विविध उपक्रम या 9595 54 5555 व्हाट्सअप क्रमांकावर अथवा व्हाट्सअप नंबर च्या

https://wa.me/919595545555

 या लिंक वर पाठवावेत.

🟫🟫🟫🟫🟫🟫

 वेबसाईट ची नियमावली पुढील प्रमाणे

🟧🟧🟧🟧🟧🟧

एखाद्या उपक्रमांत सहभागी होताना त्यापुढील सर्वस्वी जबाबदारी स्पर्धकाची असेल.

🟩🟩🟩🟩🟩🟩

त्याचबरोबर एखाद्या उपक्रमाच्या प्रवेश शूल्काविषयी योग्य ती जबाबदारी स्पर्धकाची असेल ,त्याचा वेबसाईट धारकशी कुठलाही संबंध नसेल.

⬛⬛⬛⬛⬛⬛

हा संपूर्ण उपक्रम मोफत असून यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार अथवा शुल्क आकारले जाणार नाही.

🟦🟦🟦🟦🟦🟦

सोशल मीडिया मधील फेसबुक,व्हाट्सअप, टेलिग्राम ,टेलिग्राफ ,ट्विटर, इंस्टाग्राम, ट्विटर, टम्बलर आदी विविध ॲप्स मोबाईल मध्येअसणे आवश्यक आहे.प्रत्येक निवेदना मधील फोटो मध्ये त्या त्या संस्थेची लिंक,वेबसाईट,मोबाईल नंबर किंवा संस्थेच्या नावावरून तुम्ही पुढील माहिती मिळवू शकता.काहीच उपलब्ध नसल्यास संस्थेचे नाव गुगलवर सर्च करू शकता.जगभरातील विविध भाषांमधील भाषांतरासाठी वेबसाईटवर गुगल ट्रान्सलेटर उपलब्ध आहे.

🟪🟪🟪🟪🟪🟪

त्या त्या संस्थेशी स्वतः संपर्क साधून स्पर्धकाने उपक्रमाचे दिनांक,वार,निकाल आदी तपशीलाबाबत स्वतः जागरूक राहून संपर्क साधावा.

🟥🟥🟥🟥🟥🟥












 

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %