Read Time:8 Minute, 24 Second
डॉ.बागुल यांचे ई-शैक्षणिक कार्य प्रेरणादायी-राज्यमंत्री ठाकूर रघुनाथ सिंह
डॉ.बागुल यांचे ई-शैक्षणिक कार्य प्रेरणादायी-राज्यमंत्री ठाकूर रघुनाथ सिंह-
—————————–
डॉ.अमोल बागुल यांना नवी दिल्लीमध्येे नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान
अहमदनगर-
“संपूर्ण जग कोरोनाची प्रतिकूलता सहन करत असताना शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी ई- लोक शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शेकडो देशातील लाखो शिक्षक,पालक, विद्यार्थ्यांना जोडून ठेवण्याचे काम यशस्वीरित्या वर्षभर पूर्ण केलेले आहे. देशासाठी व शिक्षण क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. नुसते घरात निष्क्रिय न बसता स्वतःतील कौशल्यांना सक्रिय करून मिळेल त्या जागी,मिळेल त्या वेळी समाजाला-जगाला सतत काही ना काही सकारात्मक देत राहण्यासाठी डॉ.बागुल यांचे प्रयत्न इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत”असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री ठाकूर रघुनाथ सिंह यांनी केले.
युनिसेफ इंडिया,लोकल टू व्होकल योजना,डिजिटल इंडिया योजना व भारत सरकार प्रमाणित नॅशनल ह्यूमन राइट ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र आणि पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये नामदार ठाकूर सिंह बोलत होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. बागुल यांना कोरोना प्रतिकूलता कालावधीतील शैक्षणिक उपक्रम ई-लोक शिक्षा अभियानाच्या वर्षपूर्ती निमित्त नॅशनल एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला.गौरवचिन्ह, मानपत्र व शिष्यवृत्ती असे या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून ऑनलाइन सर्वेक्षणातून डॉ. बागुल यांच्या उपक्रमाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार उदित राज, सुप्रीम कोर्टाचे वकील जयप्रकाश सोमाणी, मणिपाल युनिव्हर्सिटीचे संचालक एन.डी.माथूर,तिहार जेलचे पोलीस अधिकारी अंकुष शर्मा, भारतीय नियोजन आयोगाचे संचालक तथा सचिव ओमप्रकाश भैरवा,अंदमान निकोबार चे विशेष आयुक्त कुलदीपसिंग ठाकूर , वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त संचालक मिथिलेश्वर ठाकूर,मेजर जनरल विक्रम देव डोगरा,आंतरराष्ट्रीय कोच अमृता दुधिया आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ.बागुल यांच्या ई- लोक शिक्षा अभियानामध्ये २५ मार्च २०२० पासून ते २५मार्च २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत ११४ देशांमधून सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक शिक्षक,पालक,विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
“ई”म्हणजे इंटरनेटचा वापर करून सामान्य नागरिकांना “लोकांना” विविध सोशल मिडियाच्या ॲपच्या माध्यमातूनशैक्षणिक,सामाजिक,सां स्कृतिक, संगणकीय स्तरावरील प्रशिक्षणे, सेमिनार, अभ्यासक्रम यांची माहिती ऑनलाइन पाठवण्याच्या उपक्रमाला डॉ. बागुल यांनी ई-लोक शिक्षा अभियान असे नाव दिले आहे. यामध्ये देशातील पहिलाच प्रयोग असलेल्या राष्ट्राचे शिल्पकार, ई माहिती दूत, आय.सी.टी.बॉस, मान्सून/समर आर्ट कॅम्प आणि स्टडी फ्रॉम होम पॅटर्न या विविध संकल्पनांचा समावेश आहे.हा उपक्रम मोफत असून कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
५सप्टेंबर २०१९ रोजी डॉ.बागुल यांना भारताचे राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविदजी यांच्या शुभहस्ते राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.त्या समारोहातील अभिभाषणामध्ये राष्ट्रपती महोदयांनी शिक्षकांना एक वर्षांमध्ये भरीव कामगिरी करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. बागुल यांनी वर्षभरामध्ये अनेक विविध उपक्रम राबवून शिक्षक-पालक विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शिक्षणाबद्दल जनजागृती केली.
डॉ.बागूल यांना या उपक्रमासाठी स्वखर्चातून दररोज सुमारे २० जीबी डेटा लागतो तसेच बागुल दररोज साधारणत: १४ तास काम या उपक्रमांवर करतात.सुमारे ८००० पेक्षा जास्त व्हाट्सअप ग्रुप तयार करून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या पाच माध्यमातून दररोजचा अभ्यास विद्यार्थ्यांना पाठवला जातो. कोरोनाची व्याप्ती लक्षात घेऊन डॉ.बागुल यांनी या उपक्रमाचे जम्बो वेळापत्रक तयार केले आहे. यानुसार विविध विषयांचे आदल्या दिवशी नियोजन करून चार मोबाईलच्या माध्यमातून मेसेजेस मोफत पाठवले जातात.
डॉ.बागुल यांच्या उपक्रमाबद्दल भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कॅबिनेट शिक्षणमंत्री संजोग धोत्रे,महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री नामदार वर्षाताई गायकवाड,राज्यमंत्री ओम प्रकाश कडू, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी,शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे,शिक्षणाधिकारी (माध्य.)रामदास हराळ, शिक्षणाधिकारी (प्राथ) शिवाजी शिंदे, गुलाब सय्यद,मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार,समन्वयक अरुण पालवे,श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,शालेय समिती चेअरमन ॲड किशोर देशपांडे, मुख्या. श्रीम.संगीता जोशी,शिक्षक,पालक,विद्यार्थी आदींचे मार्गदर्शन व शुभेच्छा डॉ.बागूल यांना लाभल्या आहेत
स्वर्गलोक, इहलोक,पाताळ लोक या शब्दांच्या धर्तीवर बागुल यांनी इंटरनेटचा ऑनलाइन ई-उपक्रम म्हणून ई-लोक (शिक्षा अभियान)असे या उपक्रमाचे नाव दिले आहे.