0 0
Read Time:3 Minute, 54 Second



 जय असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, आयोजित जिल्ह्यातील सामाजिक संस्थांसाठी पहिल्या जिल्हास्तरीय एनजीओ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

##############

पद्मश्री पोपट पवार यांच्यासह मा.पाटील, श्री सातव, श्री गायकवाड, ॲड.होले, डॉ.बागुल, ॲड बऱ्हाटे करणार मार्गदर्शन

############

अहमदनगर/महाराष्ट्र

    जय असोसिएशन ऑफ एनजीओ(महाराष्ट्र राज्य),अहमदनगर बार असोसिएशन व कासा मनुष्यबळ विकास केंद्र,अहमदनगर यांच्या माध्यमातून सामाजिक स्वयंसेवी संस्थांसाठी पहिल्या जिल्हास्तरीय एन.जी.ओ. मार्गदर्शन कार्यशाळेचे रविवार दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये कासा सामाजिक संस्था,नगर दौंड रोड,हॉटेल समाधान जवळ,अहमदनगर( महाराष्ट्र)येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती जय असोसिएशनचे राज्य अध्यक्ष ॲड.महेश शिंदे यांनी दिली आहे.
    प्रस्तुत कार्यशाळेमध्ये पद्मश्री पोपटराव पवार (आदर्श गाव हिवरे बाजार चे प्रणेते),न्यायमूर्ती यु.एस.पाटील-चव्हाण मॅडम(उपायुक्त धर्मादाय), श्री प्र.रा.सातव(सहा धर्मादाय आयुक्त अहमदनगर),श्री.सुनील गायकवाड(कासा संस्थेचे महाराष्ट्र सहाय्यक प्रकल्प अधिकारी),ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.भानुदास होले(ज्येष्ठ विधिज्ञ), डॉ.अमोल बागुल(दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार), ॲड.भूषण बऱ्हाटे( अध्यक्ष,अहमदनगर शहर बार असोसिएशन),ॲड मेहेरनाथ कलचुरी (संचालक,अवतार मेहेर बाबा ट्रस्ट)आदी मान्यवर या कार्यशाळेत सामाजिक स्वयंसेवी संस्थांसाठी आवश्यक असणारी सामाजिक प्रतिभा व तिचा उपयुक्त वापर,संस्थेचे कागदपत्र,रेकॉर्डकीपिंग,संस्थेचे लेखापरीक्षण,संस्थेचे मिशन व्हिजन,संस्थेच्या कार्याचे सादरीकरण,शासनाच्या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे,विविध प्रस्ताव,संस्थेचा बदल अर्ज,संस्थेचे प्रकल्प अंमलबजावणी,विविध कार्यक्रमांचे आयोजन,व्यक्तिमत्व विकास,भाषण कौशल्य, सोशल मिडियाचा वापर आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
   अहमदनगर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील ज्या सामाजिक संस्थांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे अशा इच्छुक संस्थांनी ॲड.महेश शिंदे(99 2181 0096),पोपटराव बनकर(7744 011 011),ॲड अनिता दिघे(77 2000 9001) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
    कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी ॲड प्रशांत साळुंखे,सिताराम जाधव,कैलास पठारे,ईसाभाई शेख तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.



Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %