0 0
Read Time:13 Minute, 1 Second

अहमदनगर शहराच्या ५३२ व्या स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोष २०२२ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २८ मे ला आयोजन

🛑🛑🛑🛑🛑🛑

स्वागताध्यक्ष तथा मा. महापौर बाबासाहेब वाकळे व प्रमुख संयोजक सागर बोगा यांचे नगरकर रसिकांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

🛑🛑🛑🛑🛑🛑

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांचा नृत्याविष्कार तर डॉ.धामणे- नगरभूषण , डॉ. बागुल -एज्युकेशन आयकॉन,जितेंद्र तोरणे – बिझनेस आयकॉन पुरस्काराचे मानकरी

🛑🛑🛑🛑🛑🛑

या वर्षीपासून वर्षभर चालणाऱ्या अनेक सामाजिक वैद्यकीय उपक्रमांचा होणार शुभारंभ

🛑🛑🛑🛑🛑🛑

कार्यक्रमाच्या पासेससाठीनगर जल्लोष फ्री पास साठी संपर्क

दिल्लीगेट – 9975 31 7764

प्रोफेसर चौक – 9763 715 721

आकाशवाणी चौक – 94040 81 100

गुलमोहोर रोड – 9689 87 3474

सावेडी गाव – 7276 48 4444

मराठी सोयारिक संस्था – 744 778 5910

बागुगल 9595 54 5555

 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

अहमदनगर-

   येत्या २८ मे ला अहमदनगर शहराचा ५३२ वा स्थापना दिन मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करण्याचे नियोजनच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरणाऱ्या नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराने केले असून त्या अंतर्गत जॉगिंग ट्रक,सावेडी अहमदनगर येथे ‘नगर जल्लोष २०२२ कला, संस्कृती, परंपरा’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मानसी नाईक यांचा नृत्याविष्कार, महाराष्ट्राची महागायिका सन्मिता शिंदे , मराठी इंडियन आयडॉल फेम कैवल्य केजकर यांचे बहारदार गीत गायन तर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे आणि विनीत खरात या भन्नाट जोडीचे हास्याचे फवारे हे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असल्याचे या उत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे व नगर जल्लोष परिवाराचे अध्यक्ष व प्रमुख आयोजक सागर बोगा यांनी सांगितले.

 शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नगर जल्लोष परिवाराच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘नगर भूषण’ या पुरस्काराचेही वितरण या सांस्कृतिक कार्यक्रमात केले जाणार असून आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात पोहचणारे डॉ. श्री व सौ.धामणे यांना यंदाचा ‘नगर भूषण २०२२’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर विविध क्षेत्रात नगरचे नाव उंचावणाऱ्या डॉ.अमोल बागूल यांना एज्युकेशन आयकॉन तसेच उद्योजकीय  क्षेत्रात रोजगार व व्यवसाय कौशल्याच्या माध्यमातून मानदंड प्रस्थापित करणारे उद्योजक श्री जितेंद्र तोरणे यांना बिझनेस आयकॉन पुरस्कार जाहीर झाल्याची  माहिती आयोजकांनी दिली आहे.तसेच या वर्षीपासून वर्षभर चालणाऱ्या अनेक सामाजिक वैद्यकीय उपक्रमांचा होणार शुभारंभ होणार आहे.

यावेळी प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव आणि सुहास शिरसाठ,ओंकार गोवर्धन हे ही उपस्थित राहणार असूनस्थानिक नगरकर कलाकारांना देखील यामध्ये प्रामुख्याने संधी देण्यात आलेली आहे, नगरकर रसिक प्रेक्षकांनी आपला ऐतिहासिक वारसा, आपली संस्कृती जपत साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले.

या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी शिंगवी ज्वेलर्स (मुख्य प्रायोजक ), लेट्स अप( प्रायोजक ),अहमदनगर महानगरपालिका व गौतम मुनोत प्रोडक्शन (सह प्रायोजक), रोज गोल्ड(हॉस्पिटॅलिटी पार्टनर), ब्रम्हा भोज(फुड पार्टनर ) ,रेडिओ सिटी ( रेडिओ पार्टनर ), व्यंकटेश मल्टीस्टेट ( विशेष सहकार्य ) ब्रॅण्ड मेकर (ब्रँडिंग पार्टनर ) ,ओम साई सेल्स ( विशेष सहकार्य )  ,हॅट्स ऑफ मराठी व ,अहमदनगर स्टोरीज(सोशल मीडिया पार्टनर), द डे मेकर (फोटोग्राफी पार्टनर)  ग्लो बस डायग्नोस्टिक सेंटर, वाचन वेल प्रतिष्ठान, बंधन लॉन्स, आम्ही मैत्रिणी ग्रुप, वसंत पेंट्स ,रिझल्ट कॉम्प्युटर्स, विजय पेपर मार्ट रिटेलर्स, प्रवीण कोकाटे अँड असोसिएट्स, सेजल इलेक्ट्रिकल्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स ,ओम साई फायर सर्व्हिसेस,आईस क्यूब अँड कोल्ड स्टोरेज, डॉ. समर रणसिंग हॉस्पिटल, मे. नारायण कोडम एजन्सी, टाइम्स स्टील फर्निचर्स ,महारुद्र सिस्टीम दींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागतिक कीर्तीचे शिल्पकार चित्रकार व ज्येष्ठ मार्गदर्शक  प्रमोद कांबळे,विराज मुनोत, राजू ढोरे, रविंद्र राऊत यांच्यासह रूपाली सोनवणे, शारदा होशिंग , अवंती होशिंग, बालाजी वल्लाळ, पंकज मेहेर ,प्रतिक मेहेर, पुष्कर शुक्रे, कुणाल ससाणे, पुष्कर कुलकर्णी, प्रसन्ना पाठक,  निलेश जाधव , ऐश्वर्या शहा, दीपक गुंडू ,अशोक कुटे, रोहित लाहोर,दिप्ती शुक्रे पल्लवी बोगा,अक्षय आंबेकर,चेतन गायकवाड ,गायत्री गुंडपाटील,आराधना गायकवाड आदी प्रयत्नशील आहेत.

     गेल्या बारा वर्षांपासून अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण हिताच्या  कार्यक्रमांचे आयोजन करणारा नगर जल्लोष हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा परिवार आहे. या परिवाराच्या माध्यमातून वर्षभर वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप, रक्तदान शिबिर, गरजू कुटुंबांना फराळ व अन्नधान्य वाटप या सारख्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. कोरोना काळात परिवाराने गरजू कुटुंबांना व व्यक्तींना अन्न पाकिटे, अन्नधान्य, आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथीक औषधीचे मोफत वितरण करण्याबरोबरच कोरोना काळात जीवावर उदार होऊन अहमदनगर शहर व शहरवासीयांसाठी झटणाऱ्या डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 

कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून निमंत्रितांसाठी काही आसनं राखीव ठेवण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.अधिक माहितीसाठी संयोजक सागर बोगा यांच्याशी  986061 2045 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.         

 



एक हात मदतीचा उपक्रम….आपल्या “नगर जल्लोष” (ट्रस्ट) या सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या संस्थेच्या युनियन बँक Account चा QR CODE मिळाला आहे एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत……ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस असेल त्यांनी या निमित्ताने किमान ” 501 /- रुपये ” ट्रस्टच्या Account ला टाकावे ही नम्र विनंती.यामुळे ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमास आपल्या कडून मदत होईल याचा आनंद असेल.Payment केल्यावर कृपया 9860612045 या नंबर वर स्क्रिन शार्ट टाकावे ही विनंती

      नगर जल्लोष ट्रस्ट परिवारच्या वार्षिक सभासद नोंदणीस सिनेनाट्य अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिच्या हस्ते प्रारंभ…..
       सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नगर जल्लोष ट्रस्ट परिवार या संस्थेच्या वार्षिक सभासद नोंदणीस नुकताच नगरची प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गौरीला संस्थेच्या पल्लवी बोगा यांनी वार्षिक उपक्रमांची माहिती दिली. नगर जल्लोष ट्रस्ट परिवारच्या वार्षिक सभासद नोंदणीमध्ये जास्तीत जास्त नगरवासीयांनी नोंदणी करावी, असे आवाहन सभासद नोंदणीप्रसंगी गौरी कुलकर्णी हिने केले.
       नगर जल्लोष संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून वंचितांना व गरजवंतांना मदत केली जाते. नाममात्र शुल्क वार्षिक सभासद फी म्हणून घेतले जाते.
या जमा झालेल्या फीच्या माध्यमातून वार्षिक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तरी नगरकरांनी मोठ्या संख्येने वार्षिक सभासद नोंदणीत सहभागी होऊन सामाजिक कार्याला हातभार लावावा, असे आवाहन नगर जल्लोष ट्रस्ट परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.
        नगर जल्लोष ट्रस्टचे तुम्ही नाममात्र शुल्क भरून वार्षिक सभासद झाल्यानंतर तुम्ही सर्व कार्यक्रमांत सहभाग घेऊ शकता व तुम्हाला ओळखपत्र दिले जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमात वार्षिक सभासदांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली जाते. अधिक माहितीसाठी व वार्षिक सभासद नोंदणीसाठी इच्छुकांनी सागर बोगा (9860612045), दीपक गुंडू (नगर शहर, मो. 9922140120), रवी राऊत (प्रोफेसर कॉलनी चौक, 9763715721), सुहास कुलकर्णी (नगर शहर, 9850291422) सौ. स्वाती अट्टल (पाईपलाईन रोड, 9850779717), गायत्री गुंड पा. (पाईपलाईन रोड, 7498424559) व अनिता गुंडू (दिल्ली गेट, 9309583070) यांच्याशी संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %