0 0
Read Time:3 Minute, 9 Second

 


अहमदनगर जि.प.शिक्षण विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमाचे आयोजन

अहमदनगर-

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व संवर्धन व्हावे म्हणून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा परिषद,अहमदनगरच्या शिक्षण विभागाच्या वतीने
शिक्षणाधिकारी(प्राथ.)श्री. शिवाजी शिंदे  व शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. रामदास हराळ  यांच्या संकल्पनेतून
 ऑनलाइन व्याख्यान व मराठी कवितांचे ऑनलाइन कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
  दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक डॉ. अमोल बागुल यांचे “मराठी भाषा:साहित्य व संस्कृती संवर्धनात माझी भूमिका” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान तर जि.प.चे शिक्षक तथा स्तंभलेखक  संदीप वाकचौरे यांचे “भाषा आणि जीवन” या विषयावर गुरुवार दि.28जाने.2021 रोजी सायं 5=30वा. ही ऑनलाईन व्याख्याने गुगल मीट या ॲप मधील 
तसेच
फेसबुक लाईव्ह लिंक

वर सादर होणार असून अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक-पालक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन  जि.प. अहमदनगर च्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
त्याचबरोबर मराठी स्वरचित कवितांचे ऑनलाईन कवीसंमेलन देखील संपन्न होणार असून ज्या शिक्षक, पालक, विद्यार्थी अथवा मराठीप्रेमी कवींना आपल्या मराठी भाषेविषयी असलेल्या स्वरचित कविता सादर करावयाच्या आहेत अशांनी आपल्या कविता 95 95 54 55 55 या व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव व कविता 29 जानेवारी 2021 दु.12 वाजेपर्यंत पाठवायच्या आहेत. निवडक, उत्कृष्ट कवींना मराठी ऑनलाईन कवी संमेलनातून कविता सादर करण्याची संधी तसेच दिनांक वेळ याबाबत माहिती दिली जाईल.
तसेच ज्यांना सहभागी होता येणार नाही अशांसाठी युट्युब, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम ,टेलिग्राफ ,टम्बलर आदी समाज माध्यमांवरील अपलोड केलेल्या व्याख्यानांच्या व कविसंमेलनाच्या व्हिडिओच्या लिंक्स देखील सर्वांना पाठवल्या जाणार आहेत.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %