0 0
Read Time:6 Minute, 10 Second


 
ऐतिहासिक अहमदनगरच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्त “अहमदनगरची अक्षर परंपरा ऑनलाइन व्याख्यानमाला ” व ” भारतीय इतिहासाचे मोती ग्रंथप्रदर्शन ” उपक्रमांचे आयोजन

🟪🟪🟪🟪🟪🟪
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ,अहमदनगरचा उपक्रम
🟩🟩🟩🟩🟩🟩
अहमदनगर-
🟥🟥🟥🟥🟥🟥
      भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन महोत्सवानिमित्त देशभरामध्ये आयोजित “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमांतर्गत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाची प्रेरणा देणाऱ्या 6 जून या शिवस्वराज्य दिनानिमित्त तसेच ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य-मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,अहमदनगर यांच्या वतीने “अहमदनगरची अक्षर परंपरा -2022 ऑनलाइन व्याख्यानमाला” तसेच”भारतीय इतिहासाचे मोती ” या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन 28 मे ते 8 जून 2022 या कालावधीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी दिली आहे.
       भारतीय इतिहासाचे मोती या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पल्लवी निर्मळ (उपजिल्हाधिकारी, अहमदनगर),रवींद्र ठाकूर (जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर),प्रा.संतोष यादव (अभिरक्षक,अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय) या मान्यवरांच्या हस्ते शनिवार दि. 28 मे 2022 रोजी स.10वा.जिल्हा ग्रंथालय कार्यालय,अहमदनगर येथे संपन्न होणार आहे.
     “अहमदनगरची अक्षर परंपरा -2022 ऑनलाइन व्याख्यानमाला”उपक्रमामध्ये दोन राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक डॉ.अमोल बागुल संकल्पना,समन्वयक व मुलाखतकार म्हणून काम पाहणार असून रविवार दि. 29 मे 2022 रोजी दू.4 वा. “अहमदनगर चे काव्यविश्व” या विषयावर चंद्रकांत पालवे, शशिकांत शिंदे ,डॉ.कमर सुरूर ,शर्मिला गोसावी आदि मान्यवर साहित्यिकांचे ऑनलाइन चर्चासत्र संपन्न होणार आहे.
    सोमवार दि. 30 मे 2022 रोजी स.10वा” अहमदनगरची पत्रकारिता” या विषयावर शिवाजी शिर्के ,सुधीर लंके, महेंद्र कुलकर्णी या मान्यवर पत्रकारांचे चर्चासत्र संपन्न होणार असून याच दिवशी दू..4 वा. “अहमदनगरचे साहित्यविश्व ” या विषयावर मोहम्मद आजम व प्र .के . कुलकर्णी या मान्यवर साहित्यिक-समीक्षकांचे चर्चासत्र संपन्न होणार आहे .
        मंगळवार दि.31 मे 2022 रोजी स.10 वा.” अहमदनगरचे ऐतिहासिक वैभव” या विषयावर भूषण देशमुख व प्रा.अमोल बुचुडे या मान्यवर इतिहास तज्ञांचे ऑनलाईन चर्चासत्र संपन्न होणार असून याच दिवशी दु .4 वा.” आमची कहाणी…आपली कहाणी ” या प्रबोधनपर पुस्तकावर लेखिका सौ . प्राजक्ता आव्हाड यांचे ऑनलाइन चर्चासत्र संपन्न होणार आहे.
       सोमवार 6 जून 2022 रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ” झुंज नियतीशी ” पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय लेखिका मेधा देशमुख – भास्करन यांचे ऑनलाइन चर्चासत्र संपन्न होणार आहे.गूगल मिट, फेसबुक लाईव्ह, यु ट्युब तसेच विविध समाज माध्यमांच्या व्यासपीठावर या सर्व मुलाखती प्रसारित केल्या जाणार आहेत. तसेच या उपक्रमाच्या प्रत्येक ग्राफिक इमेजेस वर तळाला असणारा क्यू आर कोड स्कॅन करून आपण या मुलाखती पाहू शकता.
       ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शन 28 मे ते 8 जून 2022 या कालावधीत शासकीय सुट्ट्या वगळून सर्वांसाठी स.10.30 ते सायं 5.30 या वेळेत खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्रिवेणी बंगला,पंपिंग स्टेशन रोड,भुतकरवाडी,महालक्ष्मी उद्यानाशेजारी ,अहमदनगर येथे जास्तीत जास्त रसिक, वाचक व इतिहासप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच शासकीय ग्रंथालयाचे वर्गणीदार होऊन वाचन चळवळ समृद्ध करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी (0241-2430180)या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
🟦🟦🟦🟦🟦🟦
गूगल मिट, फेसबुक लाईव्ह, यु ट्युब तसेच विविध समाज माध्यमांच्या व्यासपीठावर ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे
🟫🟫🟫🟫🟫🟫
पुढील फेसबुक पेज लिंक वर आपल्याला मुलाखत व प्रदर्शन पाहता येईल
⬛⬛⬛⬛⬛⬛
🟧🟧🟧🟧🟧🟧
🟥🟥🟥🟥🟥🟥
🟪🟪🟪🟪🟪🟪 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %