समर्थ’ मध्ये “महाराष्ट्र देशा-दगडांच्या देशा” गारगोटी प्रदर्शन
🟥🟥🟥🟥🟥🟥
अहमदनगर-
सुमारे १४०० विद्यार्थ्यांनी विशिष्ट रंग,रूप,वास,आकार,प्रकार असलेल्या सुमारे २००० किलो गारगोट्यांच्या तसेच वैशिष्ट्यपूर्ण दगडांच्या संकलनाचे ‘महाराष्ट्र देशा-दगडांच्या देशा’ हे गारगोटी प्रदर्शन सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला येथे वार्षिक स्नेहसंमेलनात भरविण्यात आले होते
प्रशालेचे राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापनातील ज्ञानरचनावादावर आधारित उपक्रम-प्रकल्प व प्रात्यक्षिक या संकल्पनेअंतर्गत राबवलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांनी महिनाभर परिश्रम करून सुमारे १४५ प्रकारातील संकलीत केलेल्या या गारगोटी प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी, संस्थेचे अध्यक्ष डी. आर. कुलकर्णी, शाला समिती चेअरमन अँड.किशोर देशपांडे, मुख्याध्यापिका कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यामध्ये ग्रॅनाईट, मार्बल,अँडमॅट,अँल्याबस्टर,चालसीडोनी, क्रांग, क्रिस्टल, फ्लिट,फॉस्सील, पेबल,क्वार्ट्झ ग्लास, सिलिका, व्हाटेरेस सिलिका,रेव,रत्न, खडक,गार,बर्फ,कठोर टोका, वजन,पारदर्शक खनिज,बिलोरी काच,जिवाष्म, झिऑलाईट, बेसोल्ट,कोळसा,पंकाष्म,निस,अँफीबोलाईट,संगमरवर, हिरा,स्लेट,मॅगमा, जांभा, चुनखडक शेल,पाषाण, अग्निजन्य, रूपांतरित, गाळाचे, स्तरीत खडक,चिनदगड,चेरीदगड, बोल्ट, वेदी निल दगड तसेच पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ खडक आदी गारगोटी,खडक व दगडांचे हजारो प्रकार वर्गीकरणासह पाहण्यासाठी २१ते २३ डिसें. पर्यंत दररोज सकाळी १०ते ५ या वेळेत प्रोफेसर कॉलनी चौकातील समर्थ शाळेत “महाराष्ट्र देशा-दगडांच्या देशा” या प्रदर्शनात खुले होते.