0 0
Read Time:7 Minute, 40 Second

राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमात डॉ.बागुल यांनी रेखाटला सुगंधी रांगोळीचा “ॲरोमा रंगनाथ पॅटर्न “

🟥🟥🟥🟥🟥🟥

कॉपीराइट,पेटंट,ट्रेडमार्क,आय.एस.ओ. मानांकनासाठी डॉ.बागुल प्रयत्न करणार

🟦🟦🟦🟦🟦🟦
मा.न्यायाधीश महोदयांसह मान्यवरांनी केले कौतुक
 
अहमदनगर-
 
             अहमदनगर जिल्हा न्यायालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमात उद्घाटनाप्रसंगी येथील जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तथा दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित उपक्रमशील शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी स्वतः नावीन्यपूर्ण संशोधनपर संकल्पनेतून प्रथमच सुमारे 30 प्रकारच्या विविध सुगंधांतून तयार केलेल्या रंगांच्या रांगोळीचा “ॲरोमा रंगनाथ पॅटर्न “रेखाटला. उद्घाटनाच्या संपूर्ण दिवसभर जिल्हा न्यायालय परिसर रंगांनी व सुगंधाच्या घमघमाटाने बहरून गेला होता.पक्षकार, वकील महोदय तसेच लोकअदालत साठी आलेला अर्जदार वर्ग रांगोळीच्या फोटो व सेल्फीसाठी पुढाकार घेत होता.”ॲरोमा रंगनाथ” नामक सुगंधी रांगोळी रेखाटन या कलाप्रकारासाठी कॉपीराइट,पेटंट,ट्रेडमार्क,आय.एस.ओ.आदी आंतरराष्ट्रीय मानांकने व नामांकनांसाठी डॉ. बागुल प्रयत्नशील आहेत.

 

      “सुमधुर संगीत व रांगोळीच्या बहारदार प्रदर्शनातून राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमात निश्चितच सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे.”असे प्रतिपादन मा.सुधाकर यार्लगड्‌डा साहेब(अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,अहमदनगर) यांनी केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,
शंकर गोरे(आयुक्त,अहमदनगर महानगरपालिका),रेवती देशपांडे(सचिव,विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश,वरीष्ठ स्तर),एस.के.पाटील(सरकारी अभियोक्ता),अँड किशोर देशपांडे(अध्यक्ष,सेन्ट्रल वकील बार असोसिएशन),अँड अनिल सरोदे (अध्यक्ष,अहमदनगर बार असोसिएशन)आदी प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. मा.न्यायाधीश महोदयांच्या हस्ते डॉ.बागुल यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला.
        रात्री 12 ते स.7 या 7 तासांमध्ये या वास्तूचा विविधांगी परिसर डॉ. बागुल यांनी रांगोळीच्या सुगंधी रंगांनी सजवला.15 बाय 15 फुटांची राष्ट्रीय लोकअदालतीची मुख्य थीम बेस्ड स्वागतम रांगोळी, ध्वजस्तंभासमोरील रांगोळी महिरप,मा.मुख्य न्यायाधीश कक्षासमोरील प्रतिक्षा कक्ष,न्याय सेवा सदन इमारतीचे दोन मजले आदी ठिकाणी लोकअदालत प्रतीकांची सुगंधी रंगांची रेखाटने डॉ. बागुल यांनी रेखाटली.अँड अनुराधा येवले व विकास कर्डिले (क्लार्क)यांचे सहकार्य डॉ.बागुल यांना या उपक्रमाप्रसंगी लाभले.

 

 

             डॉ.बागूल यांच्या ॲरोमा रंगनाथ पॅटर्नमधील “ॲरोमा” म्हणजे निसर्गोपचारातील ॲरोमा चिकित्सा म्हणजेच गंधशास्त्र होय,विविध प्रकारचे वास सुवास व सुगंध आपल्याला प्रफुल्लित व प्रोत्साहित करतात.याकरिता सौंदर्यप्रसाधनांमध्ये विविध सुगंध,अत्तर व फाया यांचा वापर केला जातो.रंगनाथ श्रीकृष्ण व विष्णू हे भारतीय संस्कृतीत रंगांचे जनक मानले जातात,म्हणून” रंगनाथ” हे नाव देण्यात आलेले आहे.
             “ॲरोमा रंगनाथ पॅटर्न “मधील सुगंधी रंगांमध्ये अष्टगंध,बुक्का,अबीर,गुलाल,दावण,केशरी टीका,गुलाब, मोगरा, चंदन,केवडा,जाईजुई,अ‍ॅक्स,इम्पल,जीलेट,आर.जी.एक्स,टॅग्ज,रेक्सोना,सिंथॉल,ब्लॅक हॉर्स,ब्रूट,मॅग्नेट,ब्लॅक हॉर्स,हिल्टन,गस्सी,डनहिल,कॅरलोन हेरेरा,डोलायस अ‍ॅण्ड गॅबेना,दरबारी,मारुबिहग,मुलतानी,सारंग,बिलावल,ललत,कार्टिन,जॉर्जिओ,अरमानी,दालचीनी,लॅव्हेंडर,रोज,जास्मीन,केवडा,चमेली,बकुळ,हिना,चाफा,निशिगंध,पारिजातक,वाळा,कर्पूर काचरी,जटामांसी,वाळा,सुगंध कोकिळा,नागरमोथा,गुलाब जल,केवडा जल यासह सुमारे 30 प्रकारच्या सुगंधी रसायने,स्प्रे,विविध इसेन्स,अत्तर,सेंट,फुलांचे अर्क,सुगंधी माती तसेच सुगंधी मूलद्रव्यांचा वापर डॉ. बागुल यांनी आदल्या दिवशी रंगांमध्ये मिश्रणासाठी केला.

 

 

  उघड्यावर रांगोळीचा सुगंध 2 ते 3 तास तर बंदिस्त सभागृहात 7 ते 8 तास टिकतो.डॉ.बागुल यांनी नूतन व जुने जिल्हाधिकारी कार्यालय,नूतन पोलीस अधीक्षक कार्यालय,अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय,अहमदनगर महानगरपालिका आदी ठिकाणी हा सुगंधी पॅटर्न रेखाटला आहे.
          डॉ.बागुल यांच्या रांगोळीच्या आधीच्या असूबा पॅटर्नला केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार यापूर्वी प्राप्त झालेला असून असूबा पॅटर्न देखील आय.एस.ओ.व जागतिक विश्वविक्रमाने प्रमाणित आहे.ब्रह्मकुमारीच्या सहा एकर गिनीज विश्वविक्रमी महारांगोळी मधील सहभाग,दोन एकर भारताचा नकाशा,चार एकर मधील छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी याबरोबरच पोलीस परेड ग्राउंड व विविध शासकीय कार्यालयातील 1 मे,15 ऑगस्ट, व 26 जाने. निमित्त दहा वर्षांपासून रांगोळ्यांचे रेखाटन डॉ. बागुल करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %