🟦🟦🟦🟦🟦🟦
रविवारी कवयित्री प्रा.शालिनी वाघ यांच्या ” भावमेघ” काव्यसंग्रहाचे प्रकाशन व कवी संमेलनाचे आयोजन
🟥🟥🟥🟥🟥🟥
कविसंमेलनात सहभागी होण्यासाठी नवोदित कवींना आवाहन
⬛⬛⬛⬛⬛⬛
सर्वश्री डॉ.बागुल,देवचक्के,उदागे डॉ.कळमकर,लाड यांची उपस्थिती
🟫🟫🟫🟫🟫🟫
अहमदनगर-
🟧🟧🟧🟧🟧🟧
पेशाने प्राध्यापिका असलेल्या कवयित्री प्रा.शालिनी वाघ यांच्या ‘भावमेघ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन मराठी साहित्य परिषद, अहमदनगर शाखा व ऋतू प्रकाशनाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 1️⃣4️⃣ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4️⃣ वाजता कोहिनूर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रा.डॉ.च.वि.जोशी यांनी दिली आहे.
🟨🟨🟨🟨🟨🟨
दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा मसाप अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री राजेंद्र उदागे(अध्यक्ष,शब्दगंध साहित्य परिषद),डॉ.संजय कळमकर (प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार),जितेंद्र लाड (प्रसिद्ध कवी),लक्ष्मण निकम(सामाजिक कार्यकर्ते), राजेंद्र फंड( कवी गीतकार), सुदाम तागड( प्रसिद्ध अडतदार व साहित्यप्रेमी), एकनाथ गवळी(सामाजिक कार्यकर्ते)आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
🟩🟩🟩🟩🟩🟩
या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नवोदित कवींचे कविसंमेलन देखील आयोजित करण्यात आले असून ज्या कवी व कवयित्रींनी स्वरचित कविता सादर करावयाची आहे त्यांनी रविवार दिनांक 1️⃣4️⃣ नोव्हेंबर दुपारी 1️⃣ वाजेपर्यंत 8️⃣7️⃣8️⃣8️⃣ 9️⃣1️⃣1️⃣ 2️⃣5️⃣5️⃣ (८७८८ ९११ २५५) या मोबाईल क्रमांकावर आपली नाव नोंदणी करावयाची आहे,जेणेकरून संयोजकांना कविसंमेलनाच्या नियोजनासाठी मदत होईल.
🟫🟫🟫🟫🟫🟫
विविध साहित्यकृतींच्या निर्मितीसाठी राज्यामध्ये अग्रगण्य असलेल्या ऋतू प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहातील सुमारे 7️⃣0️⃣ कविता असून प्रस्तावना कवी जितेंद्र लाड यांची आहे .काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ गणेश शिंदे यांनी रेखाटले असून काव्यसंग्रहाला आयएसबीएन क्रमांक देखील प्राप्त झालेला आहे.
🟥🟥🟥🟥🟥🟥
काव्यसंग्रह प्रकाशन व कवी संमेलनासाठी जास्तीत-जास्त साहित्यिक ,सारस्वत , कवी, लेखक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा.शालिनी वाघ व ऋतू प्रकाशन यांच्या वतीने करण्यात येत आहे.
🟪🟪🟪🟪🟪🟪