Read Time:8 Minute, 59 Second
डॉ.अमोल बागुल यांना ॲडकॅम,AICTE व तेलंगणा सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
🟦🟦🟦🟦🟦🟦
डॉ.बागुल यांच्या डिजिटल एज्युकेशनच्या नाविन्यपूर्ण संकल्पना शिक्षणासाठी महत्त्वाच्या-मेजर हर्ष कुमार
🟥🟥🟥🟥🟥🟥
डॉ.बागूल यांच्या ई -लोक शिक्षा अभियानाला यशस्वी दोन वर्षे पूर्ण
🟩🟩🟩🟩🟩🟩
दिल्ली /अहमदनगर
🟫🟫🟫🟫🟫🟫
ॲडकॅम(नवी दिल्ली),भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद(एआयसीटीई ) व तेलंगणा सरकार यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शिक्षण परिषदेत अहमदनगर येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना एनसीईआरटीचे मा. सचिव मेजर हर्ष कुमार यांच्या शुभहस्ते डिजिटल एज्युकेशन व संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार गुरुग्राम(हरियाणा)येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
🟪🟪🟪🟪🟪🟪
गौरवचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रो.एम.पी.पुनिया (व्हा.चेअरमन,aicte),डॉ. विश्वजीत साहा (संचालक,शिक्षण व प्रशिक्षण,सीबीएसई बोर्ड),युवराज मलिक (संचालक,नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया), प्रो.राजीव कुमार(सदस्य सचिव,aicte) आदी उपस्थित होते.ऑनलाइन परीक्षणातून व मुलाखतीतून डॉ.बागुल यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.कार्यक्रमस्थळी डॉ.बागुल यांच्या कामाचे सादरीकरण देखील संपन्न झाले.
🟨🟨🟨🟨🟨🟨
🟦प्रस्तुत कार्यक्रमासंबंधित अधिक माहिती व फोटोसाठी खालील👇 लिंक क्लिक करा.
🟫🟫🟫🟫🟫🟫
” कोरोनाच्या कालावधी जगभरातील शिक्षकांनी विविध संकल्पनाच्या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया अव्याहत चालू ठेवली. कल्पक व संशोधक शिक्षकांमुळे डिजिटल एज्युकेशन व संशोधन क्षेत्रातील विविध संकल्पना जगासमोर आल्या व वापरल्या गेल्या. डॉ.बागूल यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षकांमुळे शिक्षणक्षेत्राला नवा चेहरा प्राप्त होत आहे. डॉ. बागुल यांच्या डिजिटल एज्युकेशनच्या संकल्पना आगामी शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच महत्त्वाच्या आहेत.”असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे मा. सचिव मेजर हर्ष कुमार यांनी केले.
🟦🟦🟦🟦🟦🟦
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟪🟪🟪🟪🟪🟪
विविध प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल 👇
🎯 *डॉ.अमोल बागुल यांना ॲडकॅम व एआयसीटीईचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…… -*
🟥🟥🟥🟥🟥🟥
🟥🟥🟥🟥🟥🟥
डॉ. अमोल बागुल यांना ॲडकॅम्प आणि एआयसीटीचा राष्ट्रीय पुरस्कार हरियाणा येथे प्रदान https://publicapp.co.in/video/ sp_t7z81l42sdfz9?share=true
🟥🟥🟥🟥🟥🟥
२५मार्च २०२० पासून कोरोना लॉकडाऊन मध्ये गुढीपाडव्यापासून डॉ. बागूल यांनी सुरू केलेल्या ” ई-लोक शिक्षा अभियानास ” २५ सप्टेंबर २०२२ रोजी २ वर्षे पूर्ण झाली आहेत.यामध्ये सुमारे ९४ देशातील २५ लाखांपेक्षा अधिक शिक्षक,पालक,विद्यार्थी सहभागी झाले आहेत.🟦”ई”म्हणजे इंटरनेटचा वापर करून सामान्य नागरिकांना “लोकांना” विविध सोशल मिडियाच्या ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक, संगणकीय स्तरावरील प्रशिक्षणे, सेमिनार,अभ्यासक्रम यांची माहिती ऑनलाइन पाठवण्याच्या उपक्रमाला डॉ. बागुल यांनी ई-लोक शिक्षा अभियान असे नाव दिले आहे. यामध्ये देशातील पहिलाच प्रयोग असलेल्या राष्ट्राचे शिल्पकार, ई माहिती दूत, आय.सी.टी.बॉस, मान्सून/समर आर्ट कॅम्प आणि स्टडी फ्रॉम होम पॅटर्न या विविध संकल्पनांचा समावेश आहे.हा उपक्रम मोफत असून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. डॉ.बागूल यांना या उपक्रमासाठी स्वखर्चातून दररोज सुमारे २० जीबी डेटा लागतो तसेच बागुल दररोज साधारणत: १५ तास काम या उपक्रमांवर करतात.सुमारे ९५०० पेक्षा जास्त व्हाट्सअप ग्रुप तयार करून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या पाच माध्यमातून दररोजचा अभ्यास विद्यार्थ्यांना पाठवला जातो. कोरोनाची व्याप्ती लक्षात घेऊन डॉ.बागुल यांनी या उपक्रमाचे जम्बो वेळापत्रक तयार केले आहे.यानुसार विविध विषयांचे आदल्या दिवशी नियोजन करून अनेक मोबाईलच्या माध्यमातून मेसेजेस मोफत पाठवले जातात.
🟨🟨🟨🟨🟨🟨
🟫डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
🟧🟧🟧🟧🟧🟧
डॉ.बागूल यांचे या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल श्री धर्मेंद्र प्रधान( शिक्षण मंत्री,भारत सरकार)श्रीमती अन्नपूर्णा देवी,डॉ.सुभास सरकार,डॉ.राजकुमार रंजन सिंग,(सर्वश्री कॅबिनेट राज्यमंत्री, शिक्षण मंत्रालय,भारत सरकार),मा वर्षाताई गायकवाड(शिक्षण मंत्री,महाराष्ट्र)मा.उदय सामंत (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री),मा.ओम प्रकाश कडू(राज्यमंत्री),श्रीमती वंदना कृष्णा(शिक्षण सचिव),मा.सूरज मांढरे( शिक्षण आयुक्त),मा.राहुल द्विवेदी( प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान), देवेंद्र सिंह( संचालक एससीईआरटी),दिनकर टेमकर(शिक्षण संचालक),दिनकर पाटील,(अध्यक्ष,मरामाउमाशि मंडळ),मा रमाकांत काठमोरे,(शिक्षण सहसंचालक तथा उपसंचालक), जिल्हाधिकारी(अहमदनगर) डॉ.राजेंद्र भोसले,उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील,शिक्षणाधिकारी (माध्य.)अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथ) भास्कर पाटील,मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात, श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,शालेय समिती चेअरमन ॲड.किशोर देशपांडे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या आहेत.
🟧🟧🟧🟧🟧🟧
अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल +91 9595 54 5555 या मोबाईल क्रमांकावर अथवा amolbagul3@gmail.com या जीमेलवर संपर्क साधू शकता.
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥