Read Time:8 Minute, 58 Second
“भावमेघ “जगण्याची भाषा मांडतो- डॉ.अमोल बागुल
भावमेघ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
अहमदनगर
“जगण्याचं डिजिटलायझेशन झाला असताना हृदयाची भाषा फक्त अस्सल कवी, लेखक ,साहित्यिक आणि सारस्वत बोलू शकतो .कॉपी-पेस्ट-डाउनलोडच्या जगात मनातून निर्मळ लिखाण कागदावर उतरणं दुर्मिळ झालेलं असताना भावमेघ काव्यसंग्रह कवयित्रीच्या शब्द प्रपंचाच्या माध्यमातुन जगण्याचा आलेख मांडतो. कल्पनाविलासाच्या पलीकडे जाऊन लिहिलेली ही समृद्ध कविता जगण्याची वास्तव भाषा मांडते” असे प्रतिपादन साहित्यिक डॉ.अमोल बागुल यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, अहमदनगर शाखा व ऋतू प्रकाशनाच्या वतीने आयोजित कवयित्री शालिनी वाघ यांच्या भावमेघ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.बागूल बोलत होते
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून यावेळी संपादक व ज्येष्ठ पत्रकार तथा अहमदनगर मसाप शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के, कवी जितेंद्र लाड, कवी चंद्रकांत पालवे, साहित्यिक प्रा डॉ.च.वि. जोशी, दशरथ खोसे , एकनाथ गवळी ,सुदाम तागड, ऋतू प्रकाशनाच्या प्रमुख प्रा.सुहासिनी जोशी,राजेंद्र उदागे,राजेंद्र फंड आदी उपस्थित होते. वृक्ष व ग्रंथ देऊन सर्व मान्यवरांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
“कवयित्रीच्या भावनांचा भावमेघ आता बरसला पाहिजे, कवयित्री शालिनी वाघ यांचा भावमेघ हा काव्यसंग्रह नवीन शब्दांना सोबत घेऊन जगण्याच्या अनोखे समीकरण कवितेच्या गणितातून मांडत आहे . अखिल स्त्री जातीच्या सुखदुःखाची व वेदनेची भलीमोठी मीमांसा हा काव्यसंग्रह मांडतो, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांनी केले.
स्वागत कवी चंद्रकांत पालवे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.डाॅ.च.वि जोशी यांनी केले.मान्यवरांच्या शुभहस्ते भावमेघ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. ऋतू प्रकाशनाच्या प्रा.सौ.जोशी यांनी काव्यसंग्रहाची व प्रकाश नाची भूमिका सांगितली. कवयित्री सौ.वाघ यांनी कविता निर्मिती, साहित्य जगणे तसेच स्वतःच्या परिचयासह एकूणच कवितेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. वाचक सुदाम तागड यांनी व्यवसायातील साहित्यिक कसा असतो याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. योगेश रासने यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मितीबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संपन्न झालेल्या काव्यसंमेलनामध्ये जिल्हाभरातून आलेल्या कवी,साहित्यिकांनी आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पाठक यांनी केले. तर डॉ.श्याम शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी सुनील गोसावी, भगवान राऊत , गणेश टिक्कल ,तुषार औटी ,शब्बीर शेख यांच्यासह साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता वाघ, शुभम वाघ,प्रिया गागरे,अर्चना पाटोळे यांनी परिश्रम घेतले.
आदरणीय अमोल बागुल* काल कोहिनुर मंगल कार्यालयात झालेला कवितेच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अप्रतिम झाला.तुझे भाषण फारच आवडले.सर्व मुद्दे कव्हर केले, हसत खेळत, विनोद सांगत सगळ्यांना खरच मंत्रमुग्ध केलेस. व्यासपिठावरील सर्वांचा, एकेकाचा,परिचय अतिशय चांगल्या पध्दतिने छान करुन दिला. तुझे भाषण सगळ्यांना फारच आवडले. कवयित्री शितल वाघ व त्यांचे भाऊ, आई व इतरांनाही फारच आनंदमय वाटले.
तुझ्या आनंदमय भाषणाचा,तुझ्या कार्याचा ,कर्त्रुत्वाचा, ,मला मनापासुन अभिमान वाटतो.एकदा माझे घरी येऊन गेल्यास, तो आनंद निश्चितच द्विगुणित होईल.
तुझे मनःपुर्वक अभिनंदन…..श्री.पी.एन.डफळ
प्रा. शालिनी वाघ यांच्या ” भावमेघ ” काव्यसंग्रहाचा विमोचन सोहळ्यास योगायोगाने उपस्थित रहाता आले.तशी त्यांची माझीओळख नव्हती , परिचय नव्हता. ऐन तारूण्याच्या बहरात अन तेही अचानक शब्दांना धरून , त्यांना वाकवून वाक्यात प्रगट करणे हे अवघड काम त्यांनी सहज केले. त्या निश्चितच कौतुकास पात्र आहे.त्यांच्या वर्कृत्वाने रसिकास खुर्चीत खिळवून ठेवले. संमोहीत केले. मला वाटते बहिरे कान देऊन ऐकत होते.मुके कविता बोलू लागतील. अतिशोयोत्की वाटेल त्यांचे लेक्चर नक्कीच विद्यार्थी / विद्यार्थीनी मन लावून व आवडीने ऐकत असतील. सहज सोप्या भाषेत , ओघवत्या शैलीत , त्या बोलत होत्या . थोराना मान, आणि सर्वांना शब्दांचे व कवितेचे दान अर्पण करुन माहेर व सासरचे नाव व लौकिक मोठा केला यात तिळमात्र शंकाच नाही !!! आणि म्हणूनच आतुरतेने * भावमेघ * मध्ये निश्चितच व निश्चितपणे डोकावतील अस मला दृढविश्वास आहे. जाता जाता एवढेच सांगेल , आडनावाने वाघ असल्या तरी त्यांच्यात शालीनता आहे, त्या नेहमीच नाविण्याच्या शोधात असतात, त्यांची स्वाक्षरी पहा ना शालीनी संपूर्ण इंग्रजीत आडनाव मात्र मराठीत .
कृष्णकांत लोणे
रसिक गौरव
१४/११/२१ कवी, लेखक , सहित्यिक
समाजरत्न , साहित्यरत्न
समाजभुषण , साहित्य शिरोमणी
केडगाव , अहमदनगर , महाराष्ट्र
मधुरभाष ९६३७७५००५२